

Ichalkaranji New Water Supply Scheme mla rahul awade statement
esakal
AI जनरेटेड सारांश, संपादकीय पडताळणीसह.
Water Supply Scheme ichalkaranji : इचलकरंजी शहरासाठी पुन्हा एकदा नवीन पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. कृष्णा नदीवर जुने दानवाड (ता. शिरोळ) येथे उद्भव आहे. जुने दानवाड, सैनिक टाकळी, राजापूरवाडी ग्रामस्थांसह इचलकरंजीतील नगरसेवक-नगरसेविकांच्या उपस्थितीत आमदार राहुल आवाडे यांनी पीपीटीच्या माध्यमातून योजनेचे सादरीकरण केले. ते म्हणाले, ‘‘योजनेबाबत मुख्यमंत्र्यांकडे सतत पाठपुरावा केला. विविध उद्भव तपासले. यातील अनेक पर्याय व्यवहार्य नव्हते; पण जुने दानवाड उद्भवावर एकमत झाले. सातारा, सांगली व कोल्हापूर पाटबंधारे विभागाने त्याला हिरवा कंदील दाखविला आहे.