मुंबई

चैत्र नवरात्रोत्सवामध्ये फळांच्या किमतीत वाढ

CD

तुर्भे, ता. २३ (बातमीदार) : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक बाजारपेठांवरही जाणवू लागला आहे. परदेशातून आयात होणाऱ्या फळांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यात देशी सफरचंदाची आवक कमी झाल्याने परदेशी सफरचंदांची मागणी वाढली आहे. सध्या चैत्र नवरात्री सुरू असल्याने सफरचंद, द्राक्ष, कलिंगड, टरबूज, पपई यांसारखी फळे महागल्याने ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, आखाती देशांतील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. जलवाहतूक उशिरा होत असून काही मार्गांवर खर्चही वाढला आहे. यामुळे आयात खर्चात वाढ होऊन त्याचा थेट परिणाम फळांच्या दरावर होत आहे. तसेच काही देशांमधून होणारी निर्यात कमी झाल्याने पुरवठ्यात घट झाली आहे. वाशी येथील एपीएमसी बाजारातील फळविक्रेत्यांनी सांगितले, की गेल्या काही आठवड्यांत परदेशी फळांच्या किमतीत २० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे ग्राहकांची खरेदी कमी झाली असून, स्थानिक फळांकडे ग्राहकांचा कल वाढताना दिसत आहे.

पूर्वी जी फळे सहज उपलब्ध होत होती त्यांचे भाव आता प्रतिकिलो मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. इराण, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि इटली या देशातून येणाऱ्या सफरचंदाला मागणी अधिक असल्याने दरदेखील अव्वाच्या सव्वा वाढले आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय ग्राहक या फळांपासून दूर राहू लागले आहेत.

व्यापारीवर्गाच्या मते, युद्ध परिस्थिती दीर्घकाळ कायम राहिल्यास आगामी काळात फळांच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानिक फळांना अधिक मागणी येऊन देशांतर्गत उत्पादकांना काही प्रमाणात फायदा होऊ शकतो.

एपीएमसीच्या घाऊक बाजारातील भाव
देश पूर्वी आता
दक्षिण आफ्रिका ३,२०० ४,२००
न्यूझीलंड ५,००० ६,०००
इटली २,५०० ३,८००
अमेरिका ४,५०० ५,५००

सध्या आखाती देशांत युद्ध सुरू असल्याने मालाचे जहाज येण्यास उशीर होत आहे. याशिवाय देशी सफरचंदाचे उत्पादन ऑगस्टमध्ये सुरू होईल. त्यामुळे मागणीदेखील वाढली आहे. येत्या काही दिवसांमध्ये भाव आटोक्यात येतील.
- संजय पिंपळे, फळ व्यापारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

Navi Mumbai: मुलगा घरी एकटाच, पालक घरी येताच समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नवी मुंबईत काय घडलं?

IPL सारखीच नवी टी२० स्पर्धा, 'या' क्रिकेट बोर्डानं केली घोषणा; सुरुवात कधी?

IPL 2026 Video: धोनी वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत खेळणार? थालाचं उत्तर ऐकून आख्ख्या स्टेडियममध्ये जल्लोष

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT