मुंबई

ई चलान दंडाचे ओझे झाले हलके

CD

ई-चलान दंडाचे ओझे झाले हलक
एक कोटी ३८ लाखांचा थकीत दंड न्यायालयाकडे जमा
ठाणे शहर, ता. २३ (बातमीदार) ः राष्ट्रीय लोकअदालत उपक्रमाला हजारो वाहनचालकांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यामुळे सरकारच्या महसुलात भर पडली असून, ई-चलान दंडाचे ओझेही हलके झाले आहे. ठाणे शहर वाहतूक शाखेच्या १८ युनिट अंतर्गत केलेल्या कारवाईत तब्बल नऊ हजार ३५४ खटले निकाली काढत एकूण एक कोटी ३८ लाख ५३ हजार ३०० इतका थकीत ई-चलान दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठोठावण्यात आलेला दंड न भरणाऱ्या वाहनचालकांवर खटला दाखल करण्यात येतो. अशी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रवींद्र पाजणकर यांच्या पुढाकाराने शनिवार (ता. १४) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले होते. या अदालतीत तडजोडीअंती एकूण नऊ हजार ३५४ खटले निकाली काढले असून, वाहनधारकांनी एकूण एक कोटी ३८ लाख ५३ हजार ३०० रुपये थकीत दंड न्यायालयात जमा केला आहे, अशी माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.

दर तीन महिन्यांनी संधी
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये दंड आकारला जातो. त्याकरिता वाहतूक पोलिसांकडून दंडाचे ई-चलान वाहनधारकाच्या मोबाईलवर पाठवले जाते. यात दंड भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांवर खटला दाखल केला जातो. अशी हजारो प्रलंबित प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्याची संधी दर तीन महिन्यांनी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये उपलब्ध केली जाते. त्यानुसार थकीत ई-चलान दंड भरणाऱ्या वाहनधारकांना सवलत देण्यात येते.

लोकअदालतीचा हा उपक्रम केवळ दंडवसुलीसाठी नसून वाहतूक नियमांबाबत नागरिकांमध्ये सजगता यावी यासाठी आहे. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊन अनेकांचे प्राण वाचतील. शिवाय ई-चलान दंडाचा भुर्दंडदेखील बसणार नाही. तेव्हा प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळून दंडात्मक कारवाई टाळावी.
- पंकज शिरसाट, उपायुक्त, ठाणे शहर वाहतूक शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

Navi Mumbai: मुलगा घरी एकटाच, पालक घरी येताच समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नवी मुंबईत काय घडलं?

IPL सारखीच नवी टी२० स्पर्धा, 'या' क्रिकेट बोर्डानं केली घोषणा; सुरुवात कधी?

IPL 2026 Video: धोनी वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत खेळणार? थालाचं उत्तर ऐकून आख्ख्या स्टेडियममध्ये जल्लोष

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT