उल्हासनगर, ता. २३ (बातमीदार) : रेकॉर्डवरील गुन्हेगार काली सरदार याने पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
उल्हासनगर कॅम्प क्रमांक २ येथील झुलेलाल स्कूल रोड परिसरात १९ मार्चला पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मनजीतसिंग लबाना यांच्यावर गुरुदीलसिंग ऊर्फ काली सरदार लबाना आणि त्याच्या साथीदारांनी जुन्या वादातून हल्ला चढविला. आरोपींनी ‘आज तुझी हत्या करतो’ अशी धमकी देत धारदार शस्त्राने डोक्यावर व चेहऱ्यावर वार केले. या हल्ल्यात मनजीतसिंग गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर भाजप जिल्हाध्यक्ष आणि उल्हासनगर महापालिकेतील गटनेते राजेश वधारिया यांनी पुढाकार घेत काली सरदारवर एमपीडीएअंतर्गत कारवाई अथवा तडीपारी करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.