मुंबई

बदलापुरात एचपीव्ही लसीकरणाला वेग

CD

बदलापूर, ता. २३ (बातमीदार) : कुळगाव-बदलापूर नगरपालिका क्षेत्रात एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहिमेला वेग देण्यात आला आहे. गर्भाशयाच्या कर्करोगापासून मुलींचे संरक्षण करण्यासाठी हा महत्त्वाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत अधिकाधिक मुलींनी सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी केले आहे.
ही लस पूर्णपणे सुरक्षित असून, जागतिक आरोग्य संघटनेची मान्यताप्राप्त आहे. याशिवाय, ती मोफत उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश अंकुश यांनी दिली. एचपीव्ही हा विषाणू प्रजनन मार्गातील संसर्गाला कारणीभूत ठरतो आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगाच्या बहुतांश प्रकरणांमध्ये त्याचा सहभाग असल्याने १४ ते १५ वयोगटातील मुलींना ही लस देणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा घोरपडे आणि उपनगराध्यक्षा प्रियांका दामले यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष दालनात तज्ज्ञ डॉक्टरांची बैठक घेण्यात आली. यामध्ये डॉ. शकुंतला चुरी, डॉ. योगेंद्र जावडेकर, डॉ. निमसाखरे तसेच स्त्रीरोगतज्ञ डॉ. भारती चटर्जी यांच्यासह अनेक तज्ञांनी सहभाग घेतला. २५ ते ३० वर्षांपासून ही लस वापरात असून, ती सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आम्ही स्वतः आमच्या कुटुंबातील मुलींनाही ही लस दिली आहे, असे सांगत डॉ. योगेंद्र जावडेकर यांनी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी मुलींना वेळेत एचपीव्ही लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टर आणि पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

गैरसमज दूर करण्यावर भर
भारतात स्तनाचा कर्करोग पहिल्या क्रमांकावर आहे. गर्भाशयमुखाचा कर्करोग दुसऱ्या क्रमांकावर असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. पूर्वी ही लस महाग असल्याने केवळ खासगी रुग्णालयांतच उपलब्ध होती; मात्र आता सरकारच्या माध्यमातून ती मोफत उपलब्ध झाल्याने अधिकाधिक मुलींना याचा लाभ मिळणार आहे. तथापि, काही नागरिकांमध्ये लशीबाबत गैरसमज आणि भीती असल्याने अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. हे गैरसमज दूर करण्यासाठी पालिकेकडून जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. दुबे रुग्णालय, कात्रप येथील दवाखाने तसेच बदलापूर ग्रामीण रुग्णालयात सकाळच्या ओपीडी वेळेत ही लस मोफत दिली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

महागड्या फेरारीतही हार्दिक ऐकतो 'हा' मंत्र; म्हणाला - "याहून पॉझिटिव्ह काहीच नाही!" पाहा Viral Video

इंडस्ट्रीतल्या 'या' अभिनेत्री आहेत एकमेकींच्या जाऊबाई; एक स्टार प्रवाहवर तर एक झी मराठीवर करतेय काम

Satara ZP News: महायुतीत ‘मिठाचा खडा’! साताऱ्याच्या राड्याने सत्ताधाऱ्यांत फूट? भाजप-शिंदे गटात अंतर्गत असंतोष उफाळला

खरातच्या पायाच पडणार! मला तो सारखं बोलवायचा, एकदा अर्ध्या वाटेत गेलो अन्...; जितेंद्र आव्हाडांनी सांगितला अनुभव

SCROLL FOR NEXT