नवी मुंबईत ज्येष्ठाला दहा लाखांचा गंडा
नवी मुंबई, ता. २३ (वार्ताहर) : सायबर चोरट्याने ६१ वर्षीय व्यक्तीची तब्बल १० लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. बनावट कॉल आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली आहे.
एअर इंडियाचे ‘महाराजा क्लब कार्ड’ देण्याच्या बहाण्याने एका सायबर चोरट्याने नवी मुंबईतील ६१ वर्षीय ट्रान्स्पोर्ट कन्सल्टंटकडून दहा लाख ३७ हजार रुपये लुबाडल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशी येथील रहिवासी श्रीधर कुमार रायकर यांना गुरुवारी (ता. ५) एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. संबंधित व्यक्तीने स्वतःचे नाव ‘वरुण कुमार’ सांगत आपण एअर इंडियातून बोलत असल्याचे भासवले. त्यानंतर ‘एअर इंडिया महाराजा क्लब कार्ड’बाबत माहिती देण्याच्या बहाण्याने त्याने रायकर यांना एक विशिष्ट मोबाईल ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. रायकर यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून संबंधित ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर सायबर चोरट्याने त्या ॲपच्या माध्यमातून रायकर यांच्या बँक खात्याची तसेच क्रेडिट कार्डची माहिती मिळवली. पुढे त्यांच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने एकूण १० लाख ३७ हजार रुपये काढून घेतले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रायकर यांनी तत्काळ एनसीआरपी पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवली. त्यानंतर रविवारी (ता. २२) त्यांनी वाशी पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष जाऊन तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.