मुंबई

जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनात कृषी मेळाव्यात शेतक-यांना मार्गदर्शन

CD

जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनात कृषी मेळाव्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन
शेतक-यांना साहित्य व प्रशस्तीपत्र वाटप
अलिबाग, ता. २३ (वार्ताहर) : मिनी सरस व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री महोत्सवात शनिवारी (ता.२१) कृषी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा परिषद सेस निधीतून विविध योजनांतर्गत अनुदानावर शेतीपयोगी साहित्य वाटप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रशस्तीपत्र वाटप तसेच या योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, जिल्हा परिषद सदस्य अनन्या गाताडे, पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, जागृती मानकर, प्रियांका मगर, निलेश घाटवळ, पूजा शिंदे, उपसभापती अश्विनी जंगम, संदेश शेवाळे, गटनेते प्रकाश पाटील, प्रीती पाटील, कविता शिंगवा, गणेश नाक्ती, सदस्य प्रियांका गुंजाळ, वैशाली करवटे, कमल शिगवण, नेहा पारंगे, साक्षी तांबेकर, सभापती प्रिया भगत, नथुराम मुकन, विलास शिंदे, रमेश नागावकर, चंद्रकांत मांडे, माजी सरपंच अविनाश गाताडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विशाल तनपुरे, मुख्य लेखा वित्त अधिकारी राहुल कदम, कृषी विकास अधिकारी पवनकुमार नजन यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शिवशाहीर वैभव घरत यांच्या प्रबोधनपर शाहिरी गीताने झाली.
मार्गदर्शन करताना मंगेश वाकडीकर यांनी, शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन सेंद्रिय शेती करणे गरजेचे आहे, यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत आहे. कृषी विभागासाठी या आर्थिक वर्षात चार कोटी चार लाखांचा निधी दिला आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी राज्य शासन व जिल्हा परिषद कायमच प्रयत्नशील राहिली आहे आणि यापुढेही राहणार आहे, असे आश्वासन दिले. मधुकर पाटील यांनी, सामूहिक शेतीचा प्रसार होण्याची गरज आहे. तरुणांनी शेती क्षेत्राकडे वळण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे सांगितले. अनन्या गाताडे यांनी, आधुनिक तंत्रद्यान शेतीत वापरून उत्पन्न कसे वाढवावे, सेंद्रिय शेती, सेंद्रिय खतांचा वापर कसा करावा हा मुख्य उद्देश या मेळाव्याचा आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांनी करून घ्यावा, असे आवाहन केले. संदेश शेवाळे यांनी, रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी, त्यांना आर्थिक बळ देऊन आधुनिक शेतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन
या मेळाव्यात रोहा येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डाॅ. मांजरेकर यांनी आंबा लागवड व व्यवस्थापन, कर्जत भात संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डाॅ. म्हसकर तर मधुमक्षिका पालन तज्ज्ञ हेमंत डुंबरे यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली.

पंचायत समितींचा सन्मान
जिल्हा परिषद सेस निधीतून विविध योजनांतर्गत अनुदानावर शेतीसाठी उपयोगी साहित्य वाटप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रशस्तीपत्र वाटप केले. त्याचप्रमाणे सेस योजनेंतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षात सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या सुधाकड-पाली पंचायत समिती प्रथम, रोहा पंचायत समिती द्वितीय व पेण पंचायत समिती तृतीय यांना गौरविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

Navi Mumbai: मुलगा घरी एकटाच, पालक घरी येताच समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नवी मुंबईत काय घडलं?

IPL सारखीच नवी टी२० स्पर्धा, 'या' क्रिकेट बोर्डानं केली घोषणा; सुरुवात कधी?

IPL 2026 Video: धोनी वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत खेळणार? थालाचं उत्तर ऐकून आख्ख्या स्टेडियममध्ये जल्लोष

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT