मुंबई

ठाणे पालिकेवरील दायित्वाचे ओझे कायम

CD

ठाणे पालिकेवरील दायित्वाचे ओझे कायम
पालिकेवर पुन्हा दोन हजार १०० कोटींचे दायित्व
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : कोरोना काळापासून ठाणे पालिकेच्या दोलायमान झालेल्या आर्थिक स्थितीत आजही हवी तशी सुधारणा झालेली नसल्याचे दिसून येत आहे. अशातच पालिकेच्या विविध विभागांना ठरवून दिलेले करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यात अपेक्षित यश आले नसल्याचे दिसून येत आहे. असे असताना दुसरीकडे पालिकेवर दोन हजार १०० कोटींच्या आसपास दायित्व असल्याची माहिती पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. यामुळे महापालिकेवरील दायित्वाचे ओझे कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठाणे महापालिकेने मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात विविध विभागांकडून एक हजार ९०० कोटी रुपयांच्या करवसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र प्रत्यक्षात हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यश आले नसल्याने उत्पन्नात तूट निर्माण झाली आहे. अशातच कोरोना काळात बिघडलेल्या आर्थिक गणितामुळे पालिकेवर अडीच ते तीन हजार कोटींचे दायित्व निर्माण झाले होते. त्यानंतर करवसुलीवर भर देत हे दायित्व कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या काळात राज्य शासनाकडून मिळालेल्या निधीमुळे दायित्व काही प्रमाणात कमी होऊन ३०० ते ४०० कोटींवर आले होते. मात्र गेल्या वर्षभरात पुन्हा दायित्वात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. दरम्यान, सोमवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सहा हजार २२१ कोटी १२ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यंदा कोणतीही करवाढ न केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी वाढते दायित्व पालिकेसमोर मोठे आव्हान ठरत आहे.

दायित्वाचे तीन भागांत वर्गीकरण
केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना व प्रकल्प, महापालिकेचे प्रकल्प असे दायित्वाचे तीन भागांत वर्गीकरण होत असून, तिन्हींची रक्कम दोन हजार १०० कोटींच्या आसपास आहे. अनेक प्रकल्पांची कामे दोन ते तीन वर्षांत पूर्ण केली जात असून, त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध होतो. हे दायित्व जरी दिसत असले तरी त्यासाठी निधी उपलब्ध होणार असून, यामुळे प्रत्यक्षात एक हजार ते एक हजार १०० कोटींचे दायित्व असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

Navi Mumbai: मुलगा घरी एकटाच, पालक घरी येताच समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नवी मुंबईत काय घडलं?

IPL सारखीच नवी टी२० स्पर्धा, 'या' क्रिकेट बोर्डानं केली घोषणा; सुरुवात कधी?

IPL 2026 Video: धोनी वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत खेळणार? थालाचं उत्तर ऐकून आख्ख्या स्टेडियममध्ये जल्लोष

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT