थकीत भाड्यासाठी ‘शिवशाही’ने कसली कंबर
मुंबई, ता. २३ : विकसकांकडे असलेले थकीत भाडे वसूल करण्यासाठी शिवशाहीने कंबर कसली आहे. पाच विकसकांकडे सुमारे ११६ कोटी रुपये २०१३ पासूनच्या भाड्याचे थकीत असून त्याचा भरणा करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे शिवशाही पुनर्वसन प्राधिकरणाकडून लवकरच त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात एसआरए प्रकल्प राबवणाऱ्या विकसकांना त्यांच्या प्रकल्पातील झोपडीधारकांची तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था करता यावी, म्हणून शिवशाही पुनर्वसन प्राधिकरणाकडून त्यांना सदनिका उपलब्ध करून दिल्या जातात. त्यापोटी त्यांनी भाडे मोजणे आवश्यक असते; मात्र पाच विकसकांकडे गेल्या १० ते १२ वर्षांपासूनची थकबाकी आहे. त्याचा भरणा केला जात नसल्याने थकीत रकमेवर लागणारे व्याज आणि दंडाच्या रकमेमुळे एकूण थकबाकी ११६ कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. वारंवार नोटीस पाठवूनही थकबाकी भरली जात नसल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती शिवशाहीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.