मुंबई

उल्हासनगरात दगडाने ठेचून तरुणाचा खून

CD

उल्हासनगरात दगडाने ठेचून तरुणाचा खून

उल्हासनगर, ता. २३ (वार्ताहर) : शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले असून, भरदिवसा तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

उल्हासनगर कॅम्प-१मधील शिवनेरीनगर परिसरात सोमवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना घडली. प्रवीण अशोक वर्मा (२७) असे मृत तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या खुनामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, जुना वाद, वैयक्तिक वैमनस्य किंवा इतर कोणता सराईत गुन्हेगार आहे का, याबाबतचा तपास पोलिस विविध अंगांनी करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील तपास उल्हासनगर पोलिसांकडून सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''शेण कुणी खाल्लं हे संजय राऊतांना विचारा'', सुषमा अंधारेंच्या 'त्या' टीकेला काँग्रेसचं उत्तर...

Alephata News : शेतकरी पुत्राची कृषी अधिकारीपदी झेप; आळे येथील आदित्य तितरचे यश

Bhor Crime : भोरमध्ये दरमहा चार तरुणींचे पलायन; पोलिसांसमोर आव्हान, पाच वर्षांत आठ महिला बेपत्ता

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT