मुंबई

मायदेशातून तपासात सहकार्य करेन

CD

मायदेशातून तपासात सहकार्य करीन

डॉ. संग्राम पाटील हमीपत्र देण्यास तयार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २३ : मायदेशात परतण्याची परवानगी मिळाल्यानंतरही पोलिसांना सहकार्य करू. तसे हमीपत्र देण्यासह आपण तयार आहोत, असे इंग्लंडस्थित यूट्युबर आणि डॉ. संग्राम पाटील यांनी सोमवारी (ता. २३) उच्च न्यायालयाला सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांविरोधात समाजमाध्यमावरून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याचा आरोप पाटील यांच्यावर आहे. पाटील यांनी त्यांच्याविरुद्ध बजावलेले लूकआऊट परिपत्रक आणि दोन गटांमध्ये शत्रुत्व वाढवल्याच्या आरोपाखाली दाखल केलेल्या गुन्ह्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ते रद्द करून इंग्लंडला परतण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित आहे आणि राजकीय भाषण व मतभेदांना गुन्हेगारी ठरवण्याच्या मुंबई पोलिसांच्या प्रयत्नांचाच एक भाग असल्याचा दावा पाटील यांनी केला. त्या याचिकेवर न्या. अश्विन भोबे यांच्या एकलपीठाने पाटील यांच्या हमीची दखल घेतली. तीन दिवसांत त्यांना याबाबतचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास परवानगी दिली आणि राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. 
----
पाटील यांची भूमिका
पाटील यांनी तपासात यापूर्वीही सहकार्य केले असून २१ जानेवारीपासून त्यांना चौकशीसाठी कोणतेही समन्स बजावलेले नाही. याशिवाय त्यांच्या कोठडीतील चौकशीची कोणतीही आवश्यकता नाही, असेही पाटील यांच्याकडून न्यायालयाला सांगण्यात आले. पाटील यांच्या मोबाईलमध्ये त्यांच्या रुग्णांचे गोपनीय तपशील असून ती माहिती कायद्याने संरक्षित असल्याने त्यांनी मोबाईल पोलिसांकडे सुपूर्द करणे शक्य नसल्याचा दावा पाटील यांनी केला. दुसरीकडे, महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी पाटील यांच्या याचिकेला विरोध केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

असं काही बोलणं झालंच नाही! ट्रम्प यांचा दावा इराणने फेटाळला, घाबरलेल्या अमेरिकेचा वेळकाढूपणा

कोलंबियात हवाई दलाचं विमान कोसळून भीषण दुर्घटना, ११० सैनिकांचा मृत्यू; घटनेचे धक्कादायक व्हिडीओ समोर

खरातच्या संस्थानचं उत्पन्न साडे चार लाखांवरून वर्षाला अडीच कोटींवर; खडे, चिंचोके मंतरून लाखोंना विकायचा

एक पेन ड्राइव्ह तपासायला किती वेळ लागतो? २४ तासांत अहवाल द्या, हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं

Air Pollution : उद्योगनगरी पिंपरी चिंचवडची हवा बिघडतेय! शुद्ध हवेचे दिवस तीन महिन्यांत केवळ १५

SCROLL FOR NEXT