माजी उपमहापौर केरकर यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
मुंबई, ता. २३ : मुंबईच्या माजी उपमहापौर आणि भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका अलका केरकर यांना सोमवारी (ता. २३) महापालिका सभागृहात महापौर रितू तावडे यांच्यासह सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवकांनी श्रद्धांजली वाहिली. माजी उपमहापौर आणि प्रभाग ९८च्या भाजपच्या विद्यमान ज्येष्ठ नगरसेविका अलका केरकर (७४) यांचे शनिवारी (ता. २१) अल्पशा आजाराने लीलावती रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी (ता. २२) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
केरकर या नगरसेवकपदावर कार्यरत असताना त्यांच्या सतत संपर्कात राहणाऱ्या भाजपच्या नगरसेविका आणि बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षा भाजपच्या हेतल गाला यांना श्रद्धांजली अर्पित करताना अश्रू अनावर झाले. तसेच, स्वप्ना म्हात्रे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी, केरकर यांचा उल्लेख मातृतुल्य करीत त्यांच्या मार्गदर्शनाला, प्रेमाला मुकल्याची खंत व्यक्त केल्या. या वेळी उपमहापौर संजय घाडी, विविध पक्षाचे गटनेते, विविध समित्यांचे अध्यक्ष, सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान, माजी मंत्री दत्ता मेघे यांचे २२ मार्चला निधन झाले. त्यांनाही महापालिका सभागृहात महापौर रितू तावडे, सर्वपक्षीय गटनेते नगरसेवकांनी श्रद्धांजली अर्पण केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.