रुग्णालयावर निष्काळजीपणाचा ठपका
कालबाह्य औषध प्रकरणात चौकशी समितीचा निष्कर्ष
विरार, ता.२४ (बातमीदार)ः वसईच्या सर डी.एम.पेटिट रुग्णालयातील कालबाह्य औषध साठा प्रकरणात पालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी चौकशी समितीची स्थापना केली होती. या समितीने रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी कामात निष्काळजीपणा केल्याचा अहवाल दिला आहे.
कालबाह्य औषध साठा प्रकरणाच्या चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होता. समितीच्या सदस्यांनी केलेल्या तपासणीत १० प्रकारची औषधे कालबाह्य असल्याचे निदर्शनास आले. तसेच रुग्णालयात कालबाह्य साठा, दीर्घ कालावधी असलेली औषधे एकाच ठिकाणी ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे व्यवस्थापनाकडून कामात निष्काळजीपणा केल्याने संबंधितांना नोटीस दिली आहे.
---------------------------
पालिकेचे आवाहन
कालबाह्य झालेल्या औषधांचा वापर बाह्यरुग्ण सेवा देत असताना रुग्णांना औषधांचे वाटप करण्यात आलेले नाही. रुग्णांना दिलेली औषधे सुरक्षित असून जीवितास कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची तक्रार अजूनही प्राप्त झालेली नाही. तसेच पालिका चांगली रुग्णसेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.