मुंबई

हापूसची आवक वाढल्याने दरात घसरण

CD

तुर्भे, ता. २४ (बातमीदार) ः वाशी येथील बाजारात कोकणातील हापूस आंब्याची आवक वाढल्याने दरात १५ ते २० टक्क्यांची घसरण झाली आहे. गुढीपाडव्यापर्यंत आवक कमी असल्यामुळे दर चढे राहिले होते; मात्र आता बाजारातील परिस्थितीत बदल होत आहे.

बाजारात कर्नाटकमधून १,२७,६१७ पेट्या, तर कोकणातून १३,९३० पेट्या आंब्यांची आवक सोमवारी (ता. २३) झाली. विशेष म्हणजे, कर्नाटक आंब्यांच्या तुलनेत कोकणातील हापूसची आवक वाढल्याने स्थानिक आंब्यांच्या दरावर परिणाम झाला आहे. यंदा वाढलेले पावसाचे प्रमाण, थंडी आणि मोहोराच्या काळात पडलेले रोग यामुळे कोकणातील आंबा उत्पादनावर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून बाजारात हापूस आंब्याची आवक कमी होती. सामान्यतः मार्चमध्ये हापूसचा मुख्य हंगाम सुरू होऊन आवक ३० हजार पेट्यांपर्यंत पोहोचते.

गुढीपाडव्याच्या सणादरम्यान मागणी वाढल्याने आवकही मोठ्या प्रमाणात वाढते; मात्र यंदा गुढीपाडव्याच्या काळात फक्त १३ हजार पेट्यांची आवक झाली होती, तर मागील वर्षी याच कालावधीत सुमारे ४० हजार पेट्या बाजारात दाखल झाल्या होत्या. आता आवक वाढू लागल्याने दरात घट होत असल्याचे चित्र आहे.
मागील आठवड्यात तीन ते पाच डझन पेटीमागे २,५०० ते ९,००० रुपये दर होता. सोमवारी हा दर घसरून दोन हजार ते सहा हजारापर्यंत आला, तर कर्नाटक आंबा ६०० ते ७०० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता.

हापूस आंब्याची आवक १ एप्रिलपासून आणखी वाढण्याची शक्यता असून दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आंबाप्रेमींना येत्या काळात दिलासा मिळणार आहे.
- संजय पिंपळे, फळ व्यापारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi UAE Visit: तेल, LNG-LPG आणि ५ अब्ज डॉलर गुंतवणूक अन्... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळालं?

Monsoon : मॉन्सून २६ मे पर्यंत केरळात दाखल होण्याचे संकेत

ITI Admission : ‘आयटीआय’च्या प्रवेशासाठी २१ मे पासून अर्ज प्रक्रिया होणार सुरू; राज्यात दीड लाखांहून अधिक जागा

IPS Officers Transfer: राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या; पुणे, नाशिकमध्येही मोठे फेरबदल, कुणाची बदली कुठे?

Who is Akash Maharaj Singh? ऋतुराज संजू, उर्विल यांना बाद करून खिशातून काढला कागद... काय लिहिलंय माहित्येय? Video Viral

SCROLL FOR NEXT