१० दिवसांत १२ किल्ले सर
रश्मी परब यांची जिंजीपर्यंत ऐतिहासिक ''स्वारी''; ''किल्ले वाचवा'' संदेश
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २४ : ''किल्ले वाचवा, इतिहास वाचवा'' हा उदात्त संदेश घेऊन ५२ वर्षीय रश्मी परब यांनी अवघ्या १० दिवसांत १२ ऐतिहासिक किल्ल्यांची सफर पूर्ण करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. २२ फेब्रुवारी ते ४ मार्च या काळात त्यांनी तब्बल ४ हजार १५४ किलोमीटरचा खडतर प्रवास मोटरसायकलवरून पूर्ण केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वारशाचे जतन आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी ही विशेष मोहीम हाती घेतली होती.
रश्मी परब यांनी नाशिकमधील साल्हेर किल्ल्यापासून या मोहिमेला सुरुवात केली. त्यानंतर खांदेरी, लोहगड, शिवनेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि अखेरीस तामिळनाडूतील ऐतिहासिक जिंजी किल्ल्यापर्यंत त्यांनी प्रवास केला. विशेष म्हणजे, प्रत्येक किल्ल्यावर त्यांनी पायी चढून ऐतिहासिक वारशाची पाहणी केली. हवामानातील बदल आणि लांब पल्ल्याचा थकवा अशा अनेक आव्हानांवर मात करत त्यांनी ही ''रणरागिणी'' स्वारी यशस्वी केली.
मूळच्या मुंबईतील परळ येथील रहिवासी असलेल्या रश्मी परब यांच्या नावावर यापूर्वीही अनेक विक्रम आहेत अष्टविनायक यात्रा अवघ्या १२ तास २९ मिनिटांत पूर्ण केली. तर महाराष्ट्रातील तीन ज्योतिर्लिंगांची यात्रा ११ तास १५ मिनिटांत पूर्ण केली आहे.
लडाख मोहीम:
अत्यंत खडतर समजली जाणारी लडाख स्वारीही त्यांनी यशस्वी केली आहे.या १२ किल्ल्यांच्या धाडसी मोहिमेची दखलही आता ''इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'' कडून घेतली जाण्याची शक्यता असून त्याची पडताळणी सुरू आहे.
तरुणांना इतिहास जपावण्याचे आवाहन
"ही केवळ माझी भ्रमंती नसून आपल्या गौरवशाली वारशाचे जतन करण्याचा प्रयत्न आहे. किल्ले वाचले तरच आपली ओळख जिवंत राहील," अशा भावना रश्मी परब यांनी व्यक्त केल्या. त्यांच्या या कामगिरीमुळे महिला सक्षमीकरणासोबतच इतिहास संवर्धनाचा संदेशही जनमानसात पोहोचत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.