मुंबई

नेरळ ग्रामपंचायतीस दोन नवीन घंटागाड्यांचे लोकार्पण;

CD

नेरळमध्ये स्वच्छता व्यवस्थेला मिळणार बळ
ग्रामपंचायतीस दोन नवीन घंटागाड्यांचे लोकार्पण
कर्जत, ता. २४ (बातमीदार) ः कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीच्या स्वच्छता व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी दोन नवीन घंटागाड्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे. या नवीन घंटागाड्यांमुळे नेरळ गावातील कचरा संकलन अधिक कार्यक्षम पद्धतीने होणार असून, स्वच्छता व्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे. या गाड्यांचे लोकार्पण सभापती नमिता घारे व उपसभापती चित्रा ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
नेरळ ग्रामपंचायतीसमोर कचरा व पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. विशेषतः घनकचरा प्रकल्प गेल्या सात महिन्यांपासून बंद पडलेला असून, कचऱ्याचे योग्य विलीकरण होत नसल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. कामगार उपलब्ध नसल्याने प्रकल्पाची स्थिती आणखी बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर, आगामी पाच दिवसांत घनकचरा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानुसार रायगड जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून १६ लाख ८० हजार रुपयांच्या गाड्या खरेदी करण्यात आल्या. या गाड्या सीएनजी इंधनावर चालणाऱ्या असल्याने पर्यावरणपूरक आहेत. एकूणच, नवीन घंटागाड्यांच्या माध्यमातून नेरळमधील स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, घनकचरा प्रकल्पही लवकर सुरू झाल्यास गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: धनगर आरक्षणासाठी मनोज जरांगे आझाद मैदनात! बोऱ्हाडेंना पाठिंबा; म्हणाले, सहा कोटी मराठे...

IPL 2026 Rule: आता 'चेंडू' अनफिट होणार, आयपीएल पाहताना मजा येणार! दुसऱ्या डावामध्ये कॅप्टन बॉल बदलण्याची मागणी करणार...

बीएमसीचा ऐतिहासिक निर्णय! हजारो कर्मचाऱ्यांना मिळणार कायमस्वरूपी घर; पण कोणत्या? जाणून घ्या...

शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; मुख्य आरोपी वर्षभरानंतर अटकेत

Gas News : गॅस टंचाईमुळे ओतूर-माळशेज पट्ट्यात पुन्हा पेटल्या चुली

SCROLL FOR NEXT