मुंबई

दोनदा पराभव, जिद्द आणि आता गटनेतेपद

CD

गटनेत्या होताच कांचन कुलकर्णी भावूक
डोंबिवली ता. २४ : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील काँग्रेसच्या नवनियुक्त गटनेत्या कांचन कुलकर्णी यांचा पदग्रहण सोहळा मंगळवारी केवळ एक राजकीय औपचारिकता न ठरता, अत्यंत भावूक ठरला. दोनवेळा पराभवाचा धक्का पचवून, जिद्दीने पुन्हा उभ्या राहणाऱ्या एका महिला लोकप्रतिनिधीने गटनेतेपदाची धुरा सांभाळताना आपल्या संघर्षाला उजाळा दिला. पालिकेतील दालनाचे उद्घाटन करताना कुलकर्णी यांना गहिवरून आले आणि पतीसह कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याबद्दल बोलताना त्यांचे डोळे पाणावले.

महापालिका मुख्यालयातील काँग्रेस गटनेता दालनात हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सत्कार स्वीकारताना कांचन कुलकर्णी यांनी आपल्या राजकीय प्रवासातील चढ-उतार मांडले. त्या म्हणाल्या, राजकारणात काम करताना दोन वेळा मला पराभवाचा सामना करावा लागला. तो काळ कठीण होता, पण प्रभागातील नागरिक आणि माझ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी माझी साथ सोडली नाही. विशेषतः माझे पती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, म्हणूनच आज मी तिसऱ्यांदा निवडून येऊन या पदापर्यंत पोहोचू शकले आहे." हे सांगताना त्यांना आपले अश्रू रोखता आले नाहीत.

कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण
एका निष्ठावान आणि जमिनीवर काम करणाऱ्या महिला कार्यकर्तीला गटनेतेपदाची महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने काँग्रेस गोटात उत्साहाचे वातावरण आहे. कुलकर्णी यांच्या भावूक होण्याने उपस्थित कार्यकर्त्यांचेही मन भरून आले. कौटुंबिक पाठबळ आणि कार्यकर्त्यांची एकजूट असेल, तर राजकारणात महिलाही शून्यातून विश्व उभे करू शकतात, याचाच आदर्श कांचन कुलकर्णी यांनी घालून दिला आहे.

लोकहिताच्या प्रश्नांवर आक्रमक राहणार
पदभार स्वीकारल्यानंतर कांचन कुलकर्णी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पालिकेतील प्रलंबित नागरी प्रश्न, आरोग्य आणि शिक्षण या विषयांवर काँग्रेस पक्ष येत्या काळात अधिक आक्रमकपणे आवाज उठवेल आणि जनहिताची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हरिश राणाचं निधन, १३ वर्षांच्या मरणयातनांमधून सुटका; भारतात पहिल्यांदाच इच्छामरण

Amazon Cloud Outage : ॲमेझॉन AWS वर ड्रोन हल्ला! UAE-बहारीन क्लाउड सेंटर ठप्प; भारतीय कंपन्यांसाठी चेतावणी, बँका-मोबाईल ॲप्स बंद

Farmers Protest : नांदगाव येथे महामार्ग रोको; आंबा-काजू बागायतदारांचा ‘वर्षा’वर धडक देण्याचा इशारा

Latest Marathi News Live Update : संभाजी नगरमध्ये वाहनांच्या गोडाऊनला आग

जगभरात गंभीर संकट, भारतासाठी चिंताजनक स्थिती; पण इंधन तुटवडा नाही; राज्यसभेत PM मोदींनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT