रणरणत्या उन्हात पोलिसांना ''ऊर्जापेय'' भेट
कल्याणमध्ये ''हेल्पिंग हॅन्ड १९ फाउंडेशन''चा स्तुत्य उपक्रम
कल्याण, ता. २४ (बातमीदार) : सध्या राज्यासह कल्याण शहरातही उन्हाचा पारा चांगलाच चढला असून नागरिकांची लाहीलाही होत आहे. अशा कडक उन्हात रस्त्यावर कर्तव्य बजावणारे वाहतूक पोलिस आणि घाम गाळणारे श्रमिक यांना दिलासा देण्यासाठी ''हेल्पिंग हॅन्ड १९ फाउंडेशन'' सरसावले आहे. सामाजिक बांधिलकी जपत या संस्थेच्या वतीने शहरात फळे आणि ऊर्जापेयांचे वाटप करण्यात आले.
वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. हे लक्षात घेऊन फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी शहरातील मुख्य चौकांमध्ये जाऊन भर उन्हात वाहतुकीचे नियमन करणाऱ्या पोलिसांना ''फ्रूट बाऊल'' आणि ''एनर्जी ड्रिंक'' देण्यात आले. तसेच रस्तेदुरुस्ती करणारे मजूर आणि प्रवाशांची ने-आण करणाऱ्या रिक्षाचालकांना फळांचे वाटप करून शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमात सोशल मीडियावरील प्रसिद्ध रील्स स्टार आणि स्वामी भक्त दीपक वालीकर यांनी स्वतः सहभागी होऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. "रणरणत्या उन्हात समाजासाठी राबणाऱ्या या योद्ध्यांना थोडासा विसावा देण्याचा हा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे," असे मत वालीकर यांनी यावेळी व्यक्त केले.
उन्हाळ्याची वाढती तीव्रता पाहता, आगामी काळातही असे जनहिताचे उपक्रम राबवण्याचा मानस ''हेल्पिंग हॅन्ड १९ फाउंडेशन''ने व्यक्त केला आहे. प्रत्यक्ष उन्हात काम करणाऱ्या शेकडो लाभार्थ्यांनी या मदतीबद्दल संस्थेचे आभार मानले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.