उल्हासनगर, ता. २४ (वार्ताहर) : समाज माध्यमावर टाकलेल्या थरारक पोस्टनंतर काही तासांतच हातात चाकू घेऊन दुकानात धडक, हप्त्याची मागणी आणि दिवसाढवळ्या लूट उल्हासनगरमध्ये घडली. या सिनेमॅटिक पण धक्कादायक घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हप्ता न दिल्याच्या कारणावरून एका व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवत पैसे उकळल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिस ठाण्यात सतनामसिंग ऊर्फ काला विजेंद्रसिंग लबाना (वय २५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजितसिंग ठाकरसिंग लबाना (वय ३८) हे उल्हासनगर ५ येथील गणेशनगर रोड परिसरात जिन्स पॅकिंगचा व्यवसाय करतात. काला याने समाज माध्यमावर ‘मेरा टारगेट अजितसिंग ऊर्फ भोगडी है’ अशी धमकी देणारी पोस्ट टाकली होती. त्यानंतर तो दुचाकीवरू अजितसिंग यांच्या दुकानासमोर आला आणि ‘धंदा करायचा असेल, तर मला दर महिन्याला हप्ता द्यावा लागेल’ असे सांगत चाकू बाहेर काढला. त्यानंतर ‘आज मी तुला सोडणार नाही’ अशी धमकी देत त्याने फिर्यादीच्या शर्टाच्या खिशातून १०५० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. विरोध केल्यावर चाकूच्या झटापटीत फिर्यादीच्या डाव्या हाताला किरकोळ दुखापत झाली. दरम्यान, घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने चाकू हवेत फिरवत ‘कोई बीच में आया तो काट दूंगा’ अशी धमकी दिली. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.