पीएनपी कॉलेज येथे जिल्हा क्रीडा स्पर्धा उत्साहात
अलिबाग, ता. २४ (वार्ताहर) : मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम, खेळ मंत्रालय भारत सरकार व प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने वेश्वी येथील पीएनपी कॉलेज येथे शनिवारी (ता.२१) जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.
यावेळी पी.एन.पी.एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, जिल्हा युवा अधिकारी मेरा युवा भारत अमित पुंडे, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तथा अध्यक्षा प्रिझम सामाजिक विकास संस्था तपस्वी नंदकुमार गोंधळी, संचालिका स्पर्धा विश्व अकॅडमी सुचिता साळवी, क्रीडा शिक्षक तेजस म्हात्रे, यतीराज पाटील, पंच पुरुषोत्तम पिंगळे, नंदकुमार वरसोलकर आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा व मार्गदर्शन करताना खेळाचे आपल्या आयुष्यातील महत्त्व पटवून दिले. तसेच चित्रलेखा पाटील यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा देत क्रीडा क्षेत्रात जास्तीत जास्त खेळाडू पुढे यावेत, याकरिता खेळाडूंना नेहमीच सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
मेरा युवा भारत अंतर्गत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत विजयी झालेल्या संघांना क्रीडा साहित्याचे वाटपदेखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सर्व विजेत्या खेळाडूंना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित पुंडे यांनी केले तर आभार तपस्वी गोंधळी यांनी मानले.
चौकट :
स्पर्धेचा अंतिम निकाल :
खेळ प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक
गोळा फेक मुले- स्वराज उमेश शिंदे मीत राजन राऊत भावेश मनोज भगत
गोळा फेक मुली कीर्ती संजय कडवे हर्षाली अभय गावंड साक्षी शशिकांत पाटील
४०० मीटर धावणे मुले यश दत्ताराम म्हात्रे सुशांत रवींद्र मढवी अक्षय राजा लेंडी
४०० मीटर धावणे मुली साक्षी जयेंद्र शिंदे आशिष निलेश पाटील अक्षता महेंद्र वार्डे
कबड्डी स्पर्धा मुले- विभागीय स्पोर्ट्स, खारेपाट विभाग जय हनुमान मंडळ, मुरूड
खो- खो स्पर्धा मुली- प्रिझम सामाजिक विकास संस्था कुलाबा क्रीडा प्रबोधनी, अलिबाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.