मुंबई

व्यावसायिक एलपीजी टंचाईचा फटका:

CD

अन्नदाता दुःखी भव..!
जिल्ह्यातील उपाहारगृहे, खानावळी बंद, व्यावसायिक सिलिंडरची टंचाई

पालघर, ता. २४ ः जिल्ह्यातील सिलिंडरच्या तुटवड्याने हॉटेल, लहान खानावळी, उपाहारगृहे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. नियमित गॅसपुरवठा खंडित झाल्याने ग्राहकांना सेवा देणे अशक्य झाल्याने ‘अन्नदाता दुःखी भव...’ अशी अवस्था व्यावसायिकांची झाली आहे.
एलपीजी सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेक हॉटेल्स, खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी कोळशाच्या शेगड्यांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे; मात्र कोळसा वापरणे अधिक वेळखाऊ आणि खर्चिक ठरत आहे. यामुळे पर्यावरणीय प्रदूषणाचाही प्रश्न निर्माण होत असून अनेकांनी जास्त प्रमाणात गॅस लागणारे खाद्यपदार्थ तयार करणे बंद केले आहे. तसेच व्यावसायिक सिलिंडरवर मर्यादा आल्याने कोळश्यावर चालणाऱ्या तंदुरी प्रकारातील खाद्यपदार्थ मिळत आहेत. त्यामुळे अन्न शिजवण्यासाठी अधिक वेळ लागत असल्याने ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.
----------------------------------
ग्राहकांच्या खिशावर ताण
- हातावर पोट असलेल्या छोट्या खानावळी, टपऱ्या, उपाहारगृहांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसत आहे. कमी भांडवलावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना महागड्या पर्यायी साधनांचा वापर करणे परवडत नसल्याने व्यवसाय डळमळीत झाला आहे.
- गॅसच्या टंचाईमुळे पर्यायी इंधनाच्या वाढत्या खर्चामुळे खाद्यपदार्थांच्या दरात वाढ झाली आहे. विशेषतः रस्त्यावरच्या खाद्य गाड्यांवर विकल्या जाणाऱ्या पदार्थांचे दर वाढल्याने सामान्य ग्राहकांच्या खिशावर ताण पडत आहे.
----------------------------
साठेबाजीला ऊत
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा सुरळीत का होत नाही, याबाबत प्रशासन, गॅस वितरकांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही ठिकाणी सिलिंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून जादा दराने विक्री होत आहे. या समस्येवर तत्काळ तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने पुरवठा साखळी मजबूत करणे, साठेबाजीवर नियंत्रण तसेच लहान व्यावसायिकांना सवलतीच्या दरात गॅस देण्याची मागणी हॉटेल्स असोसिएशनने केली आहे.
-------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: अशोक खरातने पाच नरबळी दिल्याचा संशय; सरकारी वकील थेटच बोलले, कोर्टात नेमकं काय घडलं?

Maharajbagh Zoo: महाराजबागेतील २५८ प्राण्यांची होरपळ; सव्वाशे वर्षांचा वारसा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे धोक्यात

Bhandara News: महसूल विभागातील तीन बडतर्फ, तिघे निलंबित; बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविल्याचे प्रकरण

Latest Marathi News Live Update : बारामतीमध्ये सार्वजनिक शौचलयाच्या सेफ्टी टँकचा स्फोट, महिला आणि दोन चिमुरडे जखमी

"किती ती ओव्हरॲक्टिंग ! " बिग बॉस मराठीचा VIRAL प्रोमो पाहून संकेत-सुपर्णावर प्रेक्षकांनी केली टीका

SCROLL FOR NEXT