मुंबई

टपाल कार्यालय पुन्हा उरण शहरात हलवण्याची मागणी

CD

टपाल कार्यालय पुन्हा उरण शहरात हलवण्याची मागणी
धोकादायक इमारतीमुळे पोस्ट ऑफिस जेएनपीए वसाहतीत
उरण, ता. २४ (वार्ताहर): उरण शहरातील टपाल कार्यालय जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीए) वसाहतीमध्ये हलविल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हे कार्यालय पुन्हा शहरात सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
उरणमधील जुनी टपाल इमारत धोकादायक झाल्याने सुमारे एक वर्षांपूर्वी हे कार्यालय शहरापासून सुमारे ५ किमी अंतरावरील जेएनपीए वसाहतीमध्ये हलविण्यात आले. मात्र यामुळे मोरा, नागाव, म्हातवली, केगाव, कोटनाका, काळाधोंडा, मुळेखंड, चाणजे आदी परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी वेळ व खर्च वाढत आहे.
नागरिकांना उन्ह-पावसात प्रवास करावा लागत असून आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत टपाल कार्यालय पुन्हा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.
यासंदर्भात श्रीरंग बारणे, महेश बालदी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिक पुष्पलता पाटील यांनी सांगितले की, पोस्ट ऑफिस दूर गेल्यामुळे आम्हाला उन्ह-पावसात त्रास सहन करत अतिरिक्त खर्च करून जावे लागते. त्यामुळे ते पुन्हा उरण शहरात आणावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : ४ जागांसाठी ७ संघांमध्ये शर्यत! प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची कोणाला किती संधी? जाणून घ्या डोकं चक्रावून टाकणारं समीकरण

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक

Pune tenant & PG rules : पुण्यात भाडेकरू, पेईंग गेस्ट, वापरलेल्या वाहनांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य

Onion Price Crash: सटाणा बाजारात कांद्याला ५० रु. दर; संतप्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

SSC Result : मंगळवेढा दहावी निकालात ५.८४ टक्के घसरण; इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री धनंजय पाटील ९९.८० टक्क्यांसह तालुक्यात अव्वल

SCROLL FOR NEXT