ठाणे जिल्हा परिषदेचा आज अर्थसंकल्प
‘पिंक रूम’सह आरोग्य सुविधांवर भर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : ठाणे जिल्हा परिषदेचा २०२६-२७चा अर्थसंकल्प बुधवारी (ता. २५) सादर करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवांचे बळकटीकरण आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी या अर्थसंकल्पात मोठ्या तरतुदी अपेक्षित आहेत. विशेषतः किशोरवयीन मुलींसाठी शाळांमध्ये ‘पिंक रूम’ उभारणे आणि शाळांच्या दुरुस्तीवर यंदा विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
ग्रामीण रुग्णालयांची क्षमता वाढवणे आणि शाळांमध्ये आधुनिक सुविधा पुरवणे, ही मुख्य प्राथमिकता असेल. मुख्यमंत्री ग्राम योजना, कृषी विभागाच्या नव्या योजना आणि शाळा दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. मागील वर्षीप्रमाणेच ई-संजीवनी, कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र पोर्टल आणि दाखल्यांची घरपोच सेवा यांसारख्या डिजिटल उपक्रमांना गती दिली जाणार आहे.
यंदा जिल्हा परिषदेसमोर आर्थिक नियोजनाचे मोठे आव्हान आहे. शहापूर आणि मुरबाड येथे नगर पंचायती झाल्यामुळे, तसेच १४ गावांचा नवी मुंबईत समावेश झाल्याने जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या मुद्रांक शुल्क अनुदानात घट झाली आहे. शासनाकडून सध्या ३५ कोटींचे अनुदान प्राप्त झाले आहे. अनुदानातील ही घट भरून काढण्यासाठी आणि उत्पन्नवाढीसाठी प्रशासन कोणत्या नव्या उपाययोजना सुचवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील वर्षाचा आढावा
गेल्या वर्षी तंत्रज्ञानावर आधारित १०८ कोटी ९४ लाखांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यामध्ये दिव्यांगांसाठी ‘सुगम्य भारत’ आणि भविष्य निर्वाह निधीच्या कामांसाठी ऑनलाइन प्रणालीचा समावेश होता. यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनांचा विस्तार करत ग्रामीण जनतेला थेट दिलासा देणारे निर्णय अपेक्षित आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.