मुंबई

नेरूळमधील स्वच्छतागृहांचे नुतनीकरण करण्याची युवासेनेची मागणी

CD

नेरूळमधील स्वच्छतागृहांचे नुतनीकरण करण्याची युवासेनेची मागणी
नेरूळ, ता.२४ (बातमीदार) : नेरूळ सेक्टर आठमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानात असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृह तसेच आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पादचारी पुलाच्या बाजूलाही महापालिकेचे सार्वजनिक स्वच्छतागृहाचे नुतनीकरण करावे, अशी लेखी मागणी युवा सेनेचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणिस निखील मांडवे यांनी महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.
नेरूळ सेक्टर आठमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानात महापालिकेचे सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. स्वच्छतागृह असलेली भांडी तुटलेली आहेत. शॉवरमधून पाणी येत नाही. स्वच्छतागृह दुरवस्था आली असून स्वच्छतेचा अभाव आहे. स्थानिक रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्यांचे निवारण करण्यासाठी माजी नगरसेविका सुनिता मांडवे यांच्या पाठपुराव्यानुसार व मागणीनुसार स्वच्छतागृह नुतनीकरण कामाची महापालिका प्रशासनाने नोव्हेंबर २०२५ मध्ये निविदा काढली होती. याला चार महिन्याचा कालावधी लोटला तरी, पालिका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. या स्वच्छतागृह दुरवस्थेमुळे परिसराला बकालपणा आला असून तातडीने या कामाला सुरुवात होणे आवश्यक असल्याचे निखील रतन मांडवे यांनी निवेदनात म्हटले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पादचारी पुलाच्या बाजूलाही महापालिकेचे सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. हे स्वच्छतागृह पूर्णपणे खराब झाले असून नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. शौ येथील समस्यांचे निवारण करण्यासाठी स्वच्छतागृहच्या नुतनीकरणासाठी सप्टेंबर २०२५ ला महापालिका प्रशासनाने निविदा काढली होती. या कामाला सहा महिन्याचा कालावधी लोटला तरी कामास सुरुवात झालेली नाही.

Manoj Jarange: धनगर आरक्षणासाठी मनोज जरांगे आझाद मैदनात! बोऱ्हाडेंना पाठिंबा; म्हणाले, सहा कोटी मराठे...

IPL 2026 Rule: आता 'चेंडू' अनफिट होणार, आयपीएल पाहताना मजा येणार! दुसऱ्या डावामध्ये कॅप्टन बॉल बदलण्याची मागणी करणार...

बीएमसीचा ऐतिहासिक निर्णय! हजारो कर्मचाऱ्यांना मिळणार कायमस्वरूपी घर; पण कोणत्या? जाणून घ्या...

शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; मुख्य आरोपी वर्षभरानंतर अटकेत

Gas News : गॅस टंचाईमुळे ओतूर-माळशेज पट्ट्यात पुन्हा पेटल्या चुली

SCROLL FOR NEXT