पालिकेच्या कारभारावर नागरिकांची नाराजी
मालाड, ता. २४ (बातमीदार) : विलेपार्ले पूर्व परिसरातील शहाजी राजे मार्गावरील दुर्वांकुर इमारतीसमोरील रस्त्याच्या छोट्या वळणावर पालिकेने गतिरोधक तयार केला होता. मात्र अवघ्या काही दिवसांतच तो काढून टाकण्यात आला. एवढचं नव्हे, तर गतिरोधक काढल्यानंतर त्याची माती रस्त्याकडेला टाकण्यात आली. त्यामुळे महापालिकेच्या या कारभारामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या अशा अचानक घेतलेल्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे. आधी गतिरोधक टाकला आणि तो अचानक काढला, यामागील पालिकेचा नेमका उद्देश काय होता, असा सवाल नागरिक करीत आहेत. मुळात त्याची येथे गरज नसताना तो टाकण्यात आला होता आणि काही दिवसांत तो काढलादेखील. यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय झाल्याची टीका नागरिकांनी केली. महत्त्वाचे म्हणजे हा गतिरोधक काढल्यानंतर मातीचा ढिगारा तसाच रस्त्याकडेला टाकण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आता या गोष्टीला अनेक दिवस झाल्यानंतरही तो ढिगारा तसाच रस्त्याकडेला पडून आहे. यामुळे या रस्त्याचा वापर करताना अडचणीही निर्माण होत आहेत.
हा परिसर दाट लोकवस्तीचा असून, येथे दुचाकी व इतर वाहनांच्या पार्किंगची मोठी समस्या आहे. त्यामुळे संबंधित ठिकाण स्वच्छ करून हा मातीचा ढिगारा हटवल्यास किमान दोन ते तीन दुचाकी पार्किंग तेथे करता येऊ शकतात, असेही स्थानिकांचे मत आहे. याबाबत स्थानिक नगरसेवक व मनपा प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.