मुंबई

ज्येष्ठांना मोफत बस सेवेचा लाभ

CD

ज्येष्ठांना मोफत बससेवेचा लाभ

वसई, ता. २४ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेकडून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. याच योजनांचा स्थानिकांना लाभ मिळावा म्हणून एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला असून, ज्येष्ठ नागरिक, महिला, खेळाडूंसाठी असलेल्या योजना घरोघरी पोहोचवणार असल्याची माहिती नगरसेविका मार्शलीन चाको यांनी वसईत आयोजित शिबिरात दिली.
वसई-विरार महापालिका परिवहन सेवेतून हजारो नागरिक प्रवास करतात. ज्येष्ठ नागरिकांना मोफत बससेवेचा लाभ मिळतो. त्यांना या मोफत बससेवेबाबतची अर्ज प्रक्रिया व इतर बाबींची माहिती नसते. ती माहिती प्राप्त करून देण्यासाठी प्रभाग क्रमांक २६च्या नगरसेविका मार्शलिन चाको यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी १२० ज्येष्ठ नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला. या वेळी माजी उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज, नगरसेविका प्रमिला पाटील, समाजसेवक अजिल चाको यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. तर वसई स्थानक प्रमुख दिगंबर राठोड, पास विभाग लिपिक सुरभी किणी यांचे तांत्रिक सहकार्य शिबिराला लाभले. शिबिर यशस्वी करण्यासाठी विजय प्रजापती, अँथनी जोसेफ, संदेश बेनबंसी, सिद्धार्थ डांगे आणि अंजा गाडमिनी यांनी परिश्रम घेतले.
----------
वसई : मोफत बस पास सेवा शिबिरात ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे हादरलं! बालाजीनगरात भरदिवसा आंदेकर टोळीचा गोळीबार, आरोपीच्या भावाची हत्या

IPL 2026, LSG vs RR: 'पराभूत झालो, तरीही आमचा संघ...', रिषभ पंतची 'F' ची भाषा, पराभवानंतर ऑन कॅमेरा दिली शिवी; VIDEO

Gold Rate Today: पेट्रोल-डिझेलनंतर आता सोनंही महागलं! काय आहे ताजा भाव?

Stock Market Today: ट्रम्पच्या धमकीने शेअर बाजार हादरला! सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स घसरले?

Nagpur News: उष्ण लाटेमुळे ७६ रुग्णांची नोंद; हीट रॅश, हीट एक्झाॅशन वाढले; आरोग्य यंत्रणा ॲलर्टवर

SCROLL FOR NEXT