मॉडेल कॉलेज परिसरातील टपऱ्या खाक
कल्याण, ता. २४ (बातमीदार) : चिंचपाडा रोडवरील मॉडेल कॉलेज परिसरात मंगळवारी (ता. २४) भीषण आग लागल्याची घटना घडली. रस्त्यालगत असलेल्या भाजी आणि माठ विक्रीसाठी उभारलेल्या टपऱ्यांनी अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
चिंचपाडा रोडवर मॉडेल कॉलेजच्या अगदी जवळ रस्त्याकडेला काही कच्च्या स्वरूपाच्या टपऱ्या आहेत. यात प्रामुख्याने चिकन व भाजी विक्रेते तसेच इतर छोट्या व्यावसायिकांची दुकाने होती. अचानक एका टपरीतून धूर येऊ लागला आणि काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा इतक्या उंच होत्या की लांबूनही धुराचे लोट दिसत होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग वेगाने पसरत होती. घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आणि आग आजूबाजूच्या परिसरात पसरण्यापासून रोखली.
शॉर्टसर्किटमुळे आग
आगीत भाजी आणि मातीची भांडी, रांजण विक्रीसाठी उभारलेल्या टपऱ्या पूर्णपणे खाक झाल्या आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही; मात्र शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. भरवस्तीत आणि मुख्य रस्त्यावर ही दुर्घटना घडल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलिस आणि अग्निशमन दल अधिक तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.