मुंबई

उल्हासनगरचा अर्थसंकल्प आज महासभेत

CD

उल्हासनगर, ता. २४ (बातमीदार) : स्थायी समितीच्या सभापतिपदाची निवड अद्याप रखडलेली असतानाच उल्हासनगर महापालिकेचा अर्थसंकल्प बुधवारी होणाऱ्या महासभेत सादर केला जाणार आहे. आयुक्त मनीषा आव्हाळे या अर्थसंकल्प महापौर अश्विनी निकम यांच्याकडे सुपूर्द करणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाकडे उल्हासनगरकरांचे लक्ष लागले आहे.
१८ मार्चला झालेल्या महासभेत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची घोषणा करण्यात आली होती. यात शिवसेना व भाजपचे प्रत्येकी आठ सदस्यांचा समावेश आहे. शिवसेनेतर्फे दिलीप गायकवाड, जमनू पुरस्वानी, राजेंद्रसिंह भुल्लर महाराज, कलवंतसिंग सोहता, जयप्रकाश माखीजा, महेश सुखरामानी, डिंपल कुमारी ठाकूर, विकास खरात यांची निवड करण्यात आली. तर भाजपकडून राजेश वधारिया, अर्चना करणकाळे, कविता पंजाबी, रवि जग्यासी, दीपक (टोनी) सिरवानी, राजेश वानखेडे, शंकर (शेरी) लुंड, संजय सिंह यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, सभापतीची निवड लांबणीवर पडल्याने अखेर प्रशासनाने अर्थसंकल्प थेट महासभेत सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील वर्षी ९८८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यंदाचा अर्थसंकल्प एक हजार कोटी रुपयांच्या आत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली भांडवली बाजारातून निधी उभारण्याचा संकल्प असल्याची माहिती मुख्य लेखा अधिकारी किरण भिलारे यांनी दिली.

विकासनिधीकडे लक्ष
चार वर्षांनंतर झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील विकासकामांसाठी किती निधी मिळणार, स्थायी, प्रभाग व विषय समित्यांच्या सभापतींना किती भत्ते मिळणार, तसेच कोणत्या विभागांमध्ये दरवाढ केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनचे पडसाद! जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरून प्रवास; मोर्चा काढत केंद्र सरकारवर टीका

श्रेयस, सॅमसन की पांड्या... टीम इंडियाच्या नवा ट्वेंटी-२० कर्णधार कोण? BCCI ने अखेर उत्तर दिले; म्हणाले, सूर्यकुमार यादवला बदलण्याची चर्चा...

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Sangli Wall Collapse : मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमाला गालबोट; वादळी वाऱ्यामुळे अंगावर चिरा-विटांची भिंत कोसळून 5 ते 6 भाविक ठार, 12 जण जखमी

Pakistan Bomb Blast: पाकिस्तानमध्ये बाजारात भीषण बॉम्बस्फोट; नऊ जण ठार, ३० जखमी

SCROLL FOR NEXT