मुंबई

पदोन्नतीचा कालावधी दोन वर्षांनी घटणार

CD

पदोन्नतीचा कालावधी दोन वर्षांनी घटणार
ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी लागणारा सेवा कालावधी पाच वर्षांवरून तीन वर्षांवर आणण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दोन वर्षांचा मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. विधान परिषदेत झालेल्या चर्चेनंतर शासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने हा निर्णय लवकरच प्रत्यक्षात येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेत नियम ९७ अंतर्गत झालेल्या अल्पकालीन चर्चेदरम्यान कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी ठाणे महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला. शासनाच्या ६ जून २०१७च्या अधिसूचनेनुसार पदोन्नतीसाठी तीन वर्षांचा कालावधी असताना ठाण्यात मात्र पाच वर्षांची अट ठेवल्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबई आणि अकोला महापालिकेच्या धर्तीवर ठाण्यातही पदोन्नतीचा कालावधी तीन वर्षे करण्यात यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली. यासोबतच शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या प्रलंबित राहिल्याचा मुद्दाही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. या चर्चेला उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी विषयाचे गांभीर्य मान्य करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती दिली. ठाणे महापालिकेचा सर्वसाधारण सभेचा ठराव प्राप्त झाल्यानंतर पदोन्नतीचा कालावधी पाच वर्षांऐवजी तीन वर्षे करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bar Association Election : महाराष्ट्र व गोवा वकील परिषद निवडणुकीत पुण्याचा दबदबा; २३ पैकी तब्बल आठ उमेदवार विजयी

US Iran Conflict: अमेरिका-इराणचं पुन्हा पेटलं! यूएसच्या तळांवर इराणने डागले क्षेपणास्त्र; दोन्ही देशांमधला युद्धविराम धोक्यात

Karad Crime : वैवाहिक वादातून पत्नीने भावाच्या मदतीने अभियंता पतीला कट रचून संपविले

Kuno Viral animal : दशकांनंतर कूनोच्या जंगलात दिसला रहस्यमयी 'प्राणी! कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाली पहिली झलक, मुख्यमंत्र्यांनी शेअर केले photo

मोदी सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला; यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अमरावतीत मशाली पेटल्या

SCROLL FOR NEXT