मुंबई

“ठाण्यात रंगली ज्येष्ठ कलाकारांची रंगतदार एकांकिका स्पर्धा”

CD

ज्येष्ठ कलाकारांची रंगतदार एकांकिका स्पर्धा
ठाणे, २४ (बातमीदार ) : ज्येष्ठ कलाकारांना आपले दडलेले कलागुण पुन्हा सादर करण्याची संधी देणारी ‘उत्तरार्ध एकांकिका स्पर्धा’ ठाण्यात उत्साहात पार पडली. गडकरी रंगायतन येथील तालीम हॉलमध्ये झालेल्या या प्राथमिक फेरीला राज्यभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखेच्या सहकार्याने मोरया इव्हेंट्स ॲण्ड एंटरटेनमेंट यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त असणे हा नियम असल्याने ही स्पर्धा वेगळी ठरते. यावर्षी ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर, चिपळूण, अलिबाग आणि कल्याण येथील एकूण १५ संघांनी सहभाग घेतला. सॉफ्ट कॉर्नरचे एमडी दिलीप कुलकर्णी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. परीक्षक म्हणून अनुभवी विशाल कदम आणि विनोद जाधव यांनी स्पर्धकांच्या अभिनयाचे कौतुक केले. अनेक स्पर्धकांनी दीर्घ काळानंतर रंगमंचावर उभे राहण्याचा आनंद व्यक्त केला. स्पर्धेमुळे जुन्या आवडींना नवी दिशा मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. आयोजकांनी या उपक्रमाचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर करण्याची इच्छा व्यक्त केली.

अंतिम फेरी २ एप्रिलला
या स्पर्धेची अंतिम फेरी २ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजल्यापासून गडकरी रंगायतन येथे पार पडणार आहे. त्यासाठी प्राथमिक फेरीतून ‘प्राण, मुंबई - साठी’, ‘कला संस्कृती, ठाणे - आर्टिकल २१’, ‘रंगा थिएटर्स, ठाणे - तरुणाई’, ‘मित्र सहयोग, ठाणे - अनोळखी’, ‘ठाणे आर्टगिल्ड - ती येते आणिक जाते’ या पाच एकांकिका अंतिम फेरीत दाखल झाल्या आहेत. प्रेक्षकांनी या नाट्यमहोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skill University Bill: ग्रामीण रोजगाराला मोठा बूस्ट! कौशल्य विद्यापीठ विधेयक परिषदेत मंजूर; लातूर-पुण्यात नवे विद्यापीठ उभारणार

CJI Surya Kant: चक्क सरन्यायाधीशांच्या भावालाच केला फोन; सीजेआय म्हणाले, जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी सोडणार नाही...

Lord Ram Descendants : कोण आहेत प्रभू श्रीरामाचे वंशज? आता कुठे आहेत अन् कशा परिस्थितीत जीवन जगतात? पाहा

खरातचा पत्रकाराच्या हत्येशी संबंध असल्याचा आव्हाडांचा दावा, २ आरोपींचा मृत्यू; आरोपींच्या काकांनी दावे फेटाळले

वैभव सूर्यवंशीने CSK ला दिलं आव्हान; Dhoni च्या संघाला मागील पर्वात दोन्ही सामन्यांत हरवलं होतं, IPL 2026 मध्येही...

SCROLL FOR NEXT