एसआयआयएलसी
औषधी वनस्पती लागवड कार्यशाळा
पुणे, ता. २४ : आयुर्वेदिक व सेंद्रिय उत्पादनांना ग्राहकांकडून मागणी जास्त असल्याने गेल्या काही वर्षांत औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीची गरज वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वनौषधींच्या लागवड पद्धतीविषयी मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा २६ मार्चला आयोजिली आहे. यामध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीचे महत्त्व आणि व्याप्ती, वनौषधी व सुगंधी वनस्पतींचे शेतजमिनीला होणारे फायदे, वनस्पती लागवडीचे तंत्र, नर्सरीचे तंत्र, व्यावसायिकदृष्ट्या लागवडीच्या पद्धती, औषधी वनस्पतींची प्राथमिक प्रक्रिया आणि मूल्यवर्धन, लागवड व प्रक्रिया उद्योगासाठीच्या सरकारी योजना, मार्केटिंगसाठी असणारा वाव आदींविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) प्रशिक्षण
एनजीओ व सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना आर्थिक गरज मोठ्या प्रमाणात असते. सीएसआर फंडिंगमधून त्यांना ही गरज भागवता येते. मात्र हे फंडिंग कसे मिळवावे, यासाठीचे नियम व कायदे काय आहेत, संस्थेचा प्रोजेक्ट रिपोर्ट कसा सादर करावा याबाबत बहुतेकांना माहिती नसते. या पार्श्वभूमीवरील सीएसआर ट्रेनिंग २८ व २९ मार्चला आयोजिले आहे. यामध्ये सीएसआर नेमके काय आहे आणि काय नाही, सीएसआर कायदा, अंमलबजावणी संस्थांची भूमिका, रिपोर्टिंग फ्रेमवर्क, अंमलबजावणी करण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतरची प्रक्रिया, सरकारच्या अपेक्षा, भूमिका आणि जबाबदाऱ्या, सीएसआर फंडिंगसाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया आदी बाबींवर मार्गदर्शन होणार आहे.
शासकीय ई-निविदा प्रक्रिया प्रशिक्षण
विविध शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक विश्वस्त संस्था, देवस्थाने आता ई-निविदा प्रक्रिया राबवत आहेत. याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण २९ मार्चला आयोजिले आहे. प्रशिक्षणात विविध विभागांतील नोंदणी, न दिसणाऱ्या निविदासुद्धा कशा शोधायच्या, बीओक्यू भरताना येणाऱ्या अडचणी, निविदेसाठी लागणारी कागदपत्रे, कागदपत्रे डिजिटल सही करून कशी सादर करायची, ईएमडी व एसडीमध्ये सूट कशी मिळवायची, स्वतःकडे मशिनरी नसेल तर करावयाचे भाडे करार, निविदापूर्व बैठकीला जाण्यापूर्वी करावयाच्या पंधरा महत्त्वपूर्ण गोष्टी कोणत्या याबाबत तसेच इतर महत्त्वाच्या तांत्रिक गोष्टींबद्दल सविस्तर मार्गदर्शन होणार आहे.
स्वीय सहाय्यक प्रशिक्षण
लोकप्रतिनिधींच्या स्वीय सहाय्यक (Personal Assistant) म्हणून प्रभावीपणे काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठीचे विशेष प्रशिक्षण ४ व ५ एप्रिलला आयोजिले आहे. प्रशिक्षणात स्वीय सहाय्यकाचे महत्त्व, संधी व आव्हाने, कर्तव्ये व जबाबदाऱ्या, महाराष्ट्र विधानमंडळाच्या कामकाजाची माहिती, मतदारसंघाचा अभ्यास व व्यवस्थापन यावर मार्गदर्शन होणार आहे. याशिवाय सोशल मीडियाचा प्रभावी वापर, शासन व प्रशासनाशी संपर्क व समन्वय, शासकीय व अशासकीय योजनांची माहिती, वेळेचे नियोजन तसेच लोकप्रतिनिधींच्या अपेक्षा यांचा सखोल आढावा घेतला जाईल. हे प्रशिक्षण पदवीधर उमेदवार, एमपीएससी/यूपीएससी स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, राजकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे तसेच सार्वजनिक प्रशासनात रस असणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.