मुंबई

रेबीजमुळे नालासोपाऱ्यात चिमुरडीचा मृत्यू

CD

रेबीजमुळे नालासोपाऱ्यात चिमुरडीचा मृत्यू

नालासोपारा, ता. २४ (बातमीदार) : भटक्या श्वानाच्या नखामुळे झालेल्या संसर्गामुळे नऊ वर्षांच्या कशिश सहानी हिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण रेबीज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भटक्या श्वानाचे नख लागून झालेल्या संसर्गाकडे दुर्लक्ष झाल्याने नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. सहा महिन्यांनंतर प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. कशिश नालासोपारा पश्चिमेतील सुबोध सागर इमारतीत राहत होती आणि मदर मेरी शाळेत चौथीत शिकत होती. सहा महिन्यांपूर्वी श्वानाने नख मारून जखमी केल्यानंतर तिला दवाखान्यात नेण्यात आले. या वेळी इंजेक्शनच्या भीतीने उपचार पूर्ण झाले नाहीत. जखम भरल्याने कुटुंबीयांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. मागील आठवड्यात प्रकृती खालावल्यानंतर तिला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
------
जी घटना घडली आहे ती अतिशय दुःखद आहे. इंजेक्शनच्या भीतीने या चिमुरडीला कुटुंबीयांनी कोणताही उपचार दिला नव्हता. नंतर जखम भरल्याने त्याकडे दुर्लक्ष केले. पण कोणत्याही प्राण्याच्या संपर्कातून जर एखादी जखम झाली असेल तर तातडीने उपचार घ्या. महापालिकेच्या सर्वच रुग्णालयांत रेबीजची इंजेक्शन मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.

- डॉ. भक्ती चौधरी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, वसई-विरार महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : अल्पवयीन मुली बेपत्ता प्रकरणे वाढली; मानवी तस्करी रोखण्यासाठी संसदेत आवाज

IPL 2026 Marathi News: मी माफी मागतो...! इंग्लंडच्या स्टार फलंदाजाची आयत्यावेळी माघार, हॅरी ब्रूकनंतर त्याच्यावरही होणार बंदीची कारवाई

Pune News : ‘पीटीपी’ अ‍ॅपमुळे वाहतूक शिस्तीत सुधारणा; अडीच लाख तक्रारींवर ९.३२ कोटींचा दंड

Latest Marathi News Live Update : खरातप्रकरणी तपासामध्ये काही प्राण्यांचे अवयव मिळून आले- पीडितेचे वकील

Solapur News : सावळेश्वर टोल नाक्यावर चालकाला बेदम मारहाण; वाहतूक ठप्प, तणावाचे वातावरण

SCROLL FOR NEXT