मुंबई

हिंदी चित्रपटाने उघडला ‘भारतमाता’चा पडदा!

CD

हिंदी चित्रपटाने उघडला ‘भारतमाता’चा पडदा!

मुंबई, ता. २४ : मराठी चित्रपटसृष्टीचे ‘माहेरघर’ आणि गिरणगावची शान समजले जाणारे लालबाग-परळ येथील ऐतिहासिक भारतमाता चित्रपटगृहाचा पडदा उघडला आहे. मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ गाजविणाऱ्या या चित्रपटगृहाचा पडदा मराठीऐवजी ‘धुरंधर - द रिव्हेंज’ या हिंदी चित्रपटाने उघडल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
कोविड काळात २०२०मध्‍ये या चित्रपटगृहाचे दरवाजे बंद झाले होते. मात्र प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता नव्या रूपातील ही वास्तू प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. भारतमाता चित्रपटगृह मराठी सिनेसृष्टीच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार आहे. दादा कोंडके, महेश कोठारे, सुषमा शिरोमणी, सचिन पिळगावकर यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांचे चित्रपट येथे ‘हाउसफुल्ल’ होत असत तसेच अनेक मराठी चित्रपटांचे येथे प्रीमियरही झाले आहेत. गिरणी कामगारांच्या आयुष्यातील मनोरंजनाचे हे सर्वात मोठे केंद्र होते. कोविड काळात हे चित्रपटगृह बंद झाल्याने मराठी चित्रपटप्रेमींमध्ये मोठी नाराजी होती. पूर्वी या चित्रपटगृहात ७५६ आसनव्यवस्था होती. आता बदललेल्या रचनेत ४०९ आरामदायी आसने आणि ४० विशेष बाल्कनी आसने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ३५ बाय ६० फूट आकाराच्या भव्य पडद्यावर आता ‘लेझर प्रोजेक्टर’ आणि ‘२के’ फॉर्‍मॅटमध्ये सिनेमा पाहता येणार आहे. प्रेक्षकांना चित्रपटाचा थरार अनुभवता यावा, यासाठी डॉल्बी साउंड सिस्टीम बसवण्यात आली असून, संपूर्ण चित्रपटगृह आता वातानुकूलित करण्यात आले आहे. चित्रपटगृहाचे व्यवस्थापन आता नव्या स्वरूपात समोर येत आहे. याबद्दल माहिती देताना व्यवस्थापकीय भागीदार कपिल भोपटकर म्हणाले, ‘तांत्रिकदृष्ट्या आम्ही हे चित्रपटगृह सुरू केले आहे. येथे मराठी चित्रपटच लागणार आहेत. मराठी रसिकांना चांगले उत्तमोत्तम मराठी चित्रपट पाहता येणार आहेत. तसेच काही मराठी चित्रपटांचे प्रीमियरही येथे होणार आहेत. येथे हिंदी किंवा इतर भाषांतील चित्रपट दाखवले गेले, तरी मराठी चित्रपटांना नेहमीच पहिले प्राधान्य दिले जाईल.’

RCB ठरला IPLमधला सर्वात महागडा संघ, नव्या मालकांनी मोजले १६ हजार ७०० कोटी रुपये

उद्धव ठाकरेंची निरोपाच्या भाषणात टोलेबाजी! PM मोदींपासून DyCM शिंदेंपर्यंत, सिलिंडर ते रेडा; कवितेतून मुख्यमंत्र्यांना कोपरखळ्या

वीटभट्टी व्यावसायिकाकडे कारवाई टाळण्यासाठी मागितली लाच, १० हजार घेताना महिला अधिकाऱ्याला अटक

Pimpari News : गॅस टंचाईचा फटका; विद्यार्थ्यांना अर्धपोटी राहण्याची वेळ

क्रीडा अधिकारी ते उप कर्णधार! Rinku Singh कडे कोलकाता नाइट रायडर्सने दिली मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT