बस पास योजनेसाठी ३१ मार्चची मुदत
विरार (बातमीदार) ः वसई-विरार पालिकेच्या परिवहन सेवेच्या बस प्रवास योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या मोफत पासची मुदत मार्चअखेरीस संपुष्टात येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना नव्या पाससाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वसई-विरार पालिकेच्या परिवहन सेवेमार्फत शहरातील ३७ मार्गांवर सेवा पुरवली जाते. शहरांतर्गत प्रवास करणारे हजारो प्रवासी दररोज परिवहन सेवेच्या बसमधून प्रवास करतात. ज्येष्ठ नागरिक, अपंग, कर्करोगपीडित, डायलिसिसचे रुग्णांना मोफत बस प्रवास योजनेंतर्गत विशेष पास दिला जातो. त्यामुळे लाभार्थांनी नव्या पाससाठी अर्ज करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. बस पास सुविधा सुरू ठेवण्यासाठी लाभार्थ्यांना नवीन अर्ज भरणे बंधनकारक आहे. जुना पास जमा केल्यानंतरच नवीन पास दिला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.