उमरोळीत आज श्रीरामाचा गजर
पालघर, ता. २५ (बातमीदार) ः उमरोळीतील श्रीराम हनुमान मंदिराचा अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
१९५१पासून ही परंपरा आजतागायत अविरतपणे सुरू आहे.
समाजातील विविध दलित, हरिजन, अस्पृश्य समजले जाणारे समाजबांधवांसाठी उमरोळी ग्रामपंचायतीचे प्रथम सरपंच तसेच राम मंदिराचे संस्थापक गोविंद राऊत यांनी मंदिराची निर्मिती केली होती. राऊत यांच्या मृत्यूनंतर त्यांचे ज्येष्ठ बंधू दिवंगत भालचंद्र राऊत मंदिराची धुरा समर्थपणे सांभाळत आहे. दरवर्षी रामनवमीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. धार्मिक कार्यक्रमात सर्व समाजबांधव सहभागी होतात. आजही राऊत कुटुंबातील उत्तराधिकारी जितेंद्र राऊत, नीलेश राऊत मंदिर व्यवस्थापनाचा दायित्व सांभाळत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.