मुंबई

उत्तन-विरार प्रवास जलद होणार

CD

उत्तन-विरार प्रवास जलद होणार
सागरी सेतू प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी

विरार, ता. २५ (बातमीदार) ः मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी मिळाली आहे. वन विभागाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळाल्यानंतर डिसेंबरअखेरीस एमएमआरडीएकडून प्रकल्पासाठीची निविदा प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे भविष्यात उत्तन-विरार प्रवास अवघ्या काही मिनिटांत करता येणार आहे.
वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूला भाईंदरपर्यंत वर्सोवा-भाईंदर सागरी मार्गाने जोडणी दिली जाणार आहे. या प्रकल्पाचे काम मुंबई महापालिकेकडे आहे. तर भाईंदरपासून पुढे विरारपर्यंत एमएमआरडीए उत्तन-विरारदरम्यान ५५.१२ किमी लांबीचा सागरी सेतू बांधणार आहे. २४.३५ किमीचा मुख्य सागरी सेतू असणार असून ३०.७७ किमीचे तीन अंतरबदल मार्ग असतील. त्यानुसार उत्तन अंतरबदल मार्ग ९.३२ किमी, वसई अंतरबदल मार्ग २.५ किमी, तर विरार अंतरबदल मार्ग १८.९५ किमीचा असेल. या प्रकल्पासाठी अंदाजे ५५ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी पर्यावरणीय मान्यता मिळविण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला १८ मार्चला मान्यता दिल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT