मुंबई

वारली कलेतून ग्रामसंस्कृतीचे दर्शन

CD

वारली कलेतून ग्रामसंस्कृतीचे दर्शन
दिव्यांग विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेकडून प्रशिक्षण

पालघर, ता. २५ (बातमीदार) ः दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वारली कलेच्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी मुलांनी साकारलेल्या विविध कलाकृतींमधून ग्रामीण जीवन, निसर्गाचे दर्शन घडले.
मुलांमधील कलागुणांना वाव देताना स्वावलंबनाकडे प्रेरित करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद पालघरमार्फत ३९ दिवसांचे वारली पेंटिंगचे विशेष प्रशिक्षण सात शाळांना देण्यात आले होते. या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेल्या कौशल्यांच्या आधारे प्रदर्शन भरवण्यात आले. याप्रसंगी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद शरीक मसलत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी तसेच रवींद्र शिंदे यांच्या पत्नी अनिता शिंदे उपस्थित होत्या. प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच ‘दिशा’ अभियानअंतर्गत शाळांमध्ये राबवण्यात येणारा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या शाळांनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
-------------------------
सात शाळांमधील विद्यार्थी सहभागी
जिल्हा परिषदेमार्फत जव्हारच्या नीलेश मुर्डेश्वर कर्णबधिर विद्यालय, पालघर येथील शापरिया कर्णबधिर विद्यालय, विरार येथील स्वामी परिज्ञानाश्रम कर्णबधिर विद्यालय, स्वामी परिज्ञानाश्रम मतिमंद कार्यशाळा, स्वामी परिज्ञानाश्रम मतिमंद शाळा, वसईची जीवदानी मतिमंद शाळा तसेच डहाणूची मूकबधिर बालविकास केंद्रातील मुलांना वारली पेंटिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांनी वारली कलेचे बारकावे आत्मसात केले.

Skill University Bill: ग्रामीण रोजगाराला मोठा बूस्ट! कौशल्य विद्यापीठ विधेयक परिषदेत मंजूर; लातूर-पुण्यात नवे विद्यापीठ उभारणार

CJI Surya Kant: चक्क सरन्यायाधीशांच्या भावालाच केला फोन; सीजेआय म्हणाले, जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी सोडणार नाही...

Lord Ram Descendants : कोण आहेत प्रभू श्रीरामाचे वंशज? आता कुठे आहेत अन् कशा परिस्थितीत जीवन जगतात? पाहा

खरातचा पत्रकाराच्या हत्येशी संबंध असल्याचा आव्हाडांचा दावा, २ आरोपींचा मृत्यू; आरोपींच्या काकांनी दावे फेटाळले

वैभव सूर्यवंशीने CSK ला दिलं आव्हान; Dhoni च्या संघाला मागील पर्वात दोन्ही सामन्यांत हरवलं होतं, IPL 2026 मध्येही...

SCROLL FOR NEXT