मुंबई

बोईसरमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरसाठी रांगा

CD

बोईसरमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरसाठी लांब रांगा

तारापूर, ता. २५ (बातमीदार) ः अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात इंधन आणि नैसर्गिक वायूचा तुटवडा निर्माण झाला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे स्वयंपाकाच्या एलपीजी गॅसचा पुढील काही दिवसांत अधिक तुटवडा निर्माण होईल, या भीतीने नागरिकांकडून अनावश्यक गॅस सिलिंडरच्या नोंदणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बोईसरमधील गॅस वितरक एजन्सीच्या दारात नागरिक सिलिंडर मिळवण्यासाठी दररोज सकाळपासून रांगा लावत असून वादावादीचे प्रसंगदेखील घडत असल्याने गॅस एजन्सी वितरक मात्र हैराण झाले आहेत.
पालघर जिल्ह्यात १२ लाख ५३ हजार ७५४ एलपीजी सिलिंडर गॅसधारक असून ५७ वितरकांकडून त्यांना सिलिंडर पुरवठा केला जातो. जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून युद्ध अधिक दिवस लांबण्याच्या भीतीने नागरिकांनी एलपीजी सिलिंडर गॅसची अतिरिक्त जमाखोरी सुरू केली आहे. बोईसरमधील ओसवाल परिसरात असलेल्या इंडेन गॅस एजन्सीच्या कार्यालयात एलपीजी गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या दररोज सकाळपासून रांगा लागत आहेत.
दिवसभरात २५० ते ३०० नागरिक ऑनलाइन नोंदणी करीत असून त्यांना दोन ते तीन दिवसांच्या अवधीनंतर सिलिंडर दिला जात आहे. एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू असून नागरिक भीतीपोटी अनावश्यकपणे रांगा लावत असल्याची माहिती गॅस एजन्सीच्या मालकांनी दिली.

-------------------
तेल विपणन कंपन्यांच्या नियमांनुसार साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी दोन सिलिंडर बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचा कालावधी ठेवणे बंधनकारक आहे. त्यामुळे एका सिलिंडरचे वितरण झाल्यानंतर २५ दिवस पूर्ण झाल्यावरच पुढील सिलिंडरचे बुकिंग करता येते. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व गॅस वितरकांना ग्राहकांनी बुकिंग केल्यानंतर नियमानुसार शक्य तितक्या लवकर सिलिंडरची डिलिव्हरी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बुकिंगसंदर्भात किंवा कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास नागरिकांनी संबंधित गॅस एजन्सीशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

काही ठिकाणी अफवा पसरत असल्याचे निदर्शनास आले असले, तरी पालघर जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण झालेला नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अनावश्यक घाईगडबड करून गॅस सिलिंडर साठवण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

-------------

गेल्या दोन दिवसांपासून सकाळपासून रांगेत उभे राहावे लागत आहे. जिल्हा प्रशासन गॅसपुरवठा सुरळीत असल्याचे सांगते; मात्र गॅस एजन्सीकडून गॅस देण्यात येत नसल्याने आम्हाला दिवसभर रांगेत उभे राहून गॅस घ्यावा लागत आहे.
- अमित ठाकूर, बोईसर ग्राहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

Beed Crime News : बीड पुन्हा हादरले! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; उमेश दळवीची निघृण हत्या, बेदम मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Latest Marathi News Live Update : राज्यातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा

दिवाळीनंतर नाही तर दिवाळीपूर्वीच होणार रणबीर कपूरचा रामायण सिनेमा रिलीज !

Pune News: पुण्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उकाड्यातून दिलासा; पुणेकरांना आज पावसाची साथ; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT