श्री रामरक्षा स्तोत्र पठणास उत्स्फूर्त प्रतिसाद
विरार, ता. २५ (बातमीदार) : सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे. या नवरात्रीत गुढीपाडवा ते रामनवमी असे नऊ दिवस खानिवडे येथील श्रीराम मंदिरात रामरक्षा स्तोत्राचे पठण ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. यासाठी सकाळी ७ वाजता मोठ्या संख्येने गावकरी मंदिरात जमून सामूहिक रामरक्षा पठण करीत आहेत.
वसई पूर्वेतील ऐतिहासिक अशा खानिवडे श्रीराम मंदिरात मागील अनेक दशकांपासून रामरक्षा पठणाची प्रथा सुरू आहे. यात गावातील महिलांचाही मोठा सहभाग असतो. या नवरात्रीमध्ये गावातील जास्तीत जास्त रहिवासी नऊ दिवस उपस्थित राहतात. रामनवमी, गोपाळकाला, अजा एकादशी, श्रीगणेश उत्सव इत्यादी कार्यक्रम सर्व गावकरी एकत्रितपणे साजरे करीत असतात. हे मंदिर सुमारे दीडशे वर्षे जुने असून, येथे दरवर्षी मोठ्या थाटामाटात राम जन्मोत्सव कीर्तन सोहळाही पार पडतो. नवमीला येथे पहाटेपासून अभ्यंगस्नान, काकड आरती, भजन-कीर्तन यासह अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते. तसेच रामनवमीला येथे मोठी जत्राही भरते. पालखीस खांदा देण्याचा मान शेजारच्या गावातील नागरिकांना देण्यात येत असल्याची माहिती मंदिर संस्थानतर्फे देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.