मुंबई

ग्रामपंचायतींमध्ये आता ‘बायोमेट्रिक शिस्त’!

CD

ग्रामपंचायतींमध्ये आता ‘बायोमेट्रिक शिस्त’
पंचायत समिती प्रशासनाचा कडक निर्णय
टिटवाळा, ता. २५ (वार्ताहर) : कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणाला आता चाप बसणार आहे. कार्यालयीन वेळेत दांड्या मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक हजेरी प्रणाली तत्काळ लागू करण्याचे आदेश पंचायत समितीने दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते विशाल शांताराम कुरकुटे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यामुळे सामान्य नागरिकांना साध्या कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत होते. प्रशासकीय कामात अनागोंदी निर्माण होऊन विकासकामे रेंगाळली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे जनतेमध्ये असंतोष होता.

विशाल कुरकुटे यांच्या लेखी तक्रारीची दखल घेत पंचायत समितीने कडक पावले उचलली आहेत. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता बायोमेट्रिक मशीनवर अंगठा लावणे बंधनकारक असेल. हजेरी प्रणालीत फेरफार किंवा नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल. या निर्णयामुळे ग्रामपंचायत स्तरावरील कामकाजात पारदर्शकता आणि जबाबदारीची भावना निर्माण होणार आहे. नागरिकांना वेळेत सेवा मिळावी आणि सरकारी यंत्रणेवरील विश्वास दृढ व्हावा, हाच या बायोमेट्रिक सक्तीमागील मुख्य उद्देश आहे, असे पंचायत समिती प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण
सरकारी कार्यालयातील ढिम्म कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी उचललेले हे पाऊल स्वागतार्ह मानले जात आहे. काम करा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा स्पष्ट संदेश यानिमित्ताने प्रशासनाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

बापरे! भारतात दिसला झोम्बी? पंजाबमध्ये या ठिकाणी नक्की घडतंय तरी काय? Viral Video

Vasai-Virar News : आदर्श महापौर! सत्तेचा मोह सोडला, ८५ हजारांचे मानधन नाकारले; वसई-विरार महापौरांच्या निर्णयाचा राज्यभर डंका

SCROLL FOR NEXT