मुंबई

अनधिकृत चाळींवर बुलडोझर

CD

बल्याणीत २९ अनधिकृत चाळींवर पालिकेचा हातोडा
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
टिटवाळा, ता. २५ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील बल्याणी येथे सर्व्हे क्र. १३ मधील २९ अनधिकृत चाळींच्या खोल्यांवर मंगळवारी (ता. २४) पालिकेने हातोडा चालवला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत.

ही जागा मूळची पूनमदेवी विनोद कनोजिया आणि इतर यांच्या मालकीची आहे. सुमारे १५ वर्षांपूर्वी एका स्थानिक विकसकाने या जागेवर अनधिकृतपणे चाळी उभारून त्या सर्वसामान्य नागरिकांना विकल्या होत्या. या फसवणुकीविरोधात जमीनमालकांनी कल्याण न्यायालय आणि त्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. १७ सप्टेंबर २०२५ला उच्च न्यायालयाने हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुरुवातीला दिलेली स्थगिती उठवल्यानंतर कारवाईचा मार्ग मोकळा झाला. मंगळवारी सकाळी ‘अ’ प्रभाग कार्यालयाने मोठ्या पोलिस बंदोबस्तात २९ खोल्या जमीनदोस्त केल्या.

नागरिकांचा संताप
आयुष्यभराची पुंजी खर्च करून घर घेणाऱ्या नागरिकांचे संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाले आहेत. विशेष म्हणजे ज्या विकसकाने नागरिकांची फसवणूक केली आणि अनधिकृत बांधकाम उभे केले, तो अद्याप फरार आहे. विकसक मोकाट आणि नागरिक बेघर झाल्यामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे. अनधिकृत बांधकामांमध्ये गुंतवणूक करताना नागरिकांनी कागदपत्रांची शहानिशा करणे गरजेचे आहे अन्यथा अशा कठोर कारवाईला सामोरे जावे लागते, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

बापरे! भारतात दिसला झोम्बी? पंजाबमध्ये या ठिकाणी नक्की घडतंय तरी काय? Viral Video

Vasai-Virar News : आदर्श महापौर! सत्तेचा मोह सोडला, ८५ हजारांचे मानधन नाकारले; वसई-विरार महापौरांच्या निर्णयाचा राज्यभर डंका

SCROLL FOR NEXT