मुंबई

पेसा शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त

CD

टोकावडे, ता. २५ (बातमीदार) : काही वर्षांपासून स्थगित असलेली पेसा शिक्षक भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागली आहे. ठाणे जिल्हा परिषदेमार्फत पात्र उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे दीर्घकाळ नोकरीपासून वंचित राहिलेल्या आदिवासी तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पेसा भरती २०२२ पासून न्यायालयीन कारणांमुळे रखडली होती. अंतिम टप्प्यात असताना बिगर आदिवासी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने प्रक्रिया थांबवावी लागली. त्यामुळे पात्र उमेदवारांची स्वप्ने अधांतरी राहिली होती. आदिवासी समाजाने सातत्याने संघर्ष करत हा प्रश्न लढाऊ भूमिकेतून पुढे नेला. न्यायालयीन आणि मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा केला. विविध आंदोलनांच्या माध्यमातून हा मुद्दा ठळकपणे मांडला. ‘हक्क मिळाल्याशिवाय माघार नाही’ या ठाम भूमिकेमुळे अखेर या भरती प्रक्रियेला यश मिळाले. सरकारच्या निर्देशानुसार पेसा क्षेत्रातील १७ संवर्गांतील पात्र उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. काही उमेदवारांना ११ महिन्यांसाठी मानधन तत्त्वावर नियुक्ती दिली होती. त्यानंतर तांत्रिक खंड देऊन पुढील कालावधीसाठी पुनर्नियुक्ती आदेश जारी केले आहेत.
दरम्यान, पेसा क्षेत्रातील उमेदवारांनी दाखवलेली एकजूट, चिकाटी आणि संघर्ष यामुळेच हा निर्णय शक्य झाल्याची भावना व्यक्त होत आहे. हा निर्णय केवळ नियुक्त्यांपुरता मर्यादित नसून आदिवासी समाजाच्या हक्क आणि न्यायाचा विजय मानला जात आहे.


शिक्षण सेवकाची नियुक्ती
११ फेब्रुवारीच्या सरकारी निर्णयानुसार पात्र उमेदवारांना गुणवत्तेनुसार रिक्त पदांवर ‘शिक्षण सेवक’ म्हणून तीन वर्षांसाठी नियुक्त केले आहे. या कालावधीत त्यांना दरमहा १६ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. ही प्रक्रिया मार्गी लावण्यात जिल्हा परिषदेच्या प्रशासनाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या समन्वयातून नियुक्त्या पूर्णत्वास गेल्या.

काही वर्षांपासून आम्ही या भरतीसाठी संघर्ष करत होतो. न्याय मिळेल, यावर विश्वास ठेवून सातत्याने प्रयत्न केले आणि अखेर आज तो दिवस आला. ही नियुक्ती आमच्यासाठी केवळ नोकरी नाही, तर आमच्या हक्काचा विजय आहे
- गणेश पारधी, पेसा शिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरातचा पत्रकाराच्या हत्येशी संबंध असल्याचा आव्हाडांचा दावा, २ आरोपींचा मृत्यू; आरोपींच्या काकांनी दावे फेटाळले

वैभव सूर्यवंशीने CSK ला दिलं आव्हान; Dhoni च्या संघाला मागील पर्वात दोन्ही सामन्यांत हरवलं होतं, IPL 2026 मध्येही...

Mhada Lottery: लॉटरीशिवाय घरांचे स्वप्न साकार! प्रथम येणाऱ्यास प्राधान्य; २० दिवसांत ६४ घरांची विक्री

Mangalwedha News: अवकाळीने द्राक्ष, डाळिंब मातीमोल, तरीही प्रशासनाचा 'निल' अहवाल; शेतकरी संघटना आक्रमक

IPL 2026 चे सामने कधी आणि कुठे पाहता येणार LIVE? टाइमिंगपासून ते स्ट्रीमिंगपर्यंत... जाणून घ्या चॅनेल आणि OTT डिटेल्स

SCROLL FOR NEXT