मुंबई

गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखा

CD

गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखा
ठाणे पालिका महापौर, आयुक्त यांनी दिले निर्देश
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवू शकणारी इंधन टंचाई आणि स्थानिक पातळीवर होणारा गॅसचा काळाबाजार रोखण्याचे निर्देश रोखण्यासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी दिले आहेत. शहरातील घरगुती आणि व्यावसायिक गॅस पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. २३) एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी गॅस वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करून नागरिकांना दिलासा देण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
या बैठकीस उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, सर्वपक्षीय गटनेते जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील, पोलिस विशेष शाखेच्या मीना मकवाना, उपायुक्त मधुकर बोडके, शिधावाटप कार्यालयाचे प्रशांत काळे, सुरेखा चव्हाण, सुभाष डुंबरे आणि महानगर गॅसचे अधिकारी उपस्थित होते.
ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना सिलेंडर वेळेत मिळत आहे. तसेच वेटिंग लिस्ट कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असल्याचे एचपी गॅसचे जिल्हा नोडल अधिकारी चित्रा नायर यांनी नमूद केले. विशेषतः लहान व्यावसायिकांना वेळेत सिलेंडर मिळत नसल्याबाबत चर्चा करण्यात आली.
गॅस पाइपलाइन सप्लायवर अधिक लक्ष केंद्रित करणे, प्रत्येक प्रभागात रेशनिंग ऑफिस व गॅस एजन्सींमध्ये समन्वय वाढवणे, नागरिकांच्या प्रलंबित अर्जांची यादी तयार करून ठराविक वेळेत निपटारा करणे, स्थानिक नगरसेवकांकडून प्राप्त तक्रारी संकलित करून त्या गॅस कंपन्यांकडे पाठवाव्यात आणि त्यानुसार पुढील कार्यवाही करावी. स्थानिक पातळीवर प्रभावी नियोजन करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.

पाईप गॅस कनेक्शन मंजूरी
प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या गॅस कनेक्शनसंदर्भातील मागण्या संकलित करून त्या संबंधित कंपन्यांकडे पाठवाव्यात. त्यानुसार महानगर गॅस व इतर गॅस कंपन्यांनी प्राधान्यक्रम ठरवून कामे पूर्ण करावीत, असे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले. अनेक ठिकाणी पाईप गॅस कनेक्शन मंजूर असूनही प्रत्यक्ष पुरवठा सुरू झालेला नाही. अशा ठिकाणी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश महापौरांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skill University Bill: ग्रामीण रोजगाराला मोठा बूस्ट! कौशल्य विद्यापीठ विधेयक परिषदेत मंजूर; लातूर-पुण्यात नवे विद्यापीठ उभारणार

CJI Surya Kant: चक्क सरन्यायाधीशांच्या भावालाच केला फोन; सीजेआय म्हणाले, जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी सोडणार नाही...

Lord Ram Descendants : कोण आहेत प्रभू श्रीरामाचे वंशज? आता कुठे आहेत अन् कशा परिस्थितीत जीवन जगतात? पाहा

खरातचा पत्रकाराच्या हत्येशी संबंध असल्याचा आव्हाडांचा दावा, २ आरोपींचा मृत्यू; आरोपींच्या काकांनी दावे फेटाळले

वैभव सूर्यवंशीने CSK ला दिलं आव्हान; Dhoni च्या संघाला मागील पर्वात दोन्ही सामन्यांत हरवलं होतं, IPL 2026 मध्येही...

SCROLL FOR NEXT