उल्हासनगर, ता. २५ (वार्ताहर) : उल्हासनगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याभोवतीचा वाद आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते राज असरोंडकर यांनी अखेर बेमुदत उपोषणाचा इशारा देत प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे. १ एप्रिलपासून उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतल्याने या प्रकरणात नव्या संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उल्हासनगर कॅम्प ३ मधील शांतीनगर स्मशानभूमीत उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याबाबतचा वाद आता चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. सामाजिक कार्यकर्ते राज असरोंडकर यांनी या पुतळ्याविरोधात बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात राज्याच्या गृहसचिव मनीषा म्हैसकर यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवले आहे. १ एप्रिलपासून राहत्या घरी उपोषण सुरू करण्याचा त्यांनी इशारा दिला आहे. हा पुतळा आवश्यक प्रशासकीय परवानग्या न घेता स्मशानभूमीत उभारल्याचा दावा असरोंडकर यांनी केला आहे. पुतळा धोरणातील अटी-शर्तींचे उल्लंघन झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. पुतळ्याच्या चबुतऱ्यावर पालिकेचे नाव असूनही प्रशासनाने जबाबदारी नाकारली आहे.
पुतळा तातडीने हलवून सुरक्षित ठिकाणी ठेवावा आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्या त्यांनी केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.