मुरबाड, ता. २५ (वार्ताहर) : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर टोकावडे व परिसरातील २९ गावांतील भाविकांच्या सहभागातून अखंड हरिनाम सप्ताह व ‘श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर’ पारायण सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. संत-महंतांच्या आशीर्वादाने पार पडलेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक ऊर्जा अनुभवास आली.
सप्ताहाची सुरुवात संगमेश्वरचे मठाधिपती योगी गोपीनाथ महाराज, गवळेश्वरचे योगी हौशीनाथ महाराज, हभप गणपत महाराज सोलसे व मधुकर महाराज मलिक यांच्या हस्ते ग्रंथपूजन, वीणापूजन आणि ज्ञानेश्वरी पूजनाने झाली. त्यानंतर पारायण वाचन हभप मलिक महाराज, खंडू मुरबाडे (आण्णा), मोतीराम शिंदे, दीपक घागस, तुकाराम रोठे, कांताराम घोलप, बाळकृष्ण म्हाडसे, मेघराज घरत गुरुजी, श्रीराम उंबरे व आत्माराम घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले.
गायनाचार्य गोविंद महाराज पवार, भूषण महाराज देशमुख व मोहन वेखंडे यांच्या नेतृत्वाखाली दररोज सायंकाळी हरिपाठ सादर करण्यात आला. पहाटे काकडा भजन हभप लता घरत, गीता राऊत, नामदेव केदार, रामचंद्र भोईर, विठ्ठल घोलप व विजय घोलप यांच्या नेतृत्वाखाली झाले. मृदुंगवादनासाठी सुधीर कराळे, नितीन राऊत, सिद्धेश बांगर, विशाल भोंडिवले व रोहित देसले यांनी साथ दिली. या सप्ताहात हभप सुनील महाराज भोईर (टेंभरे), शामसुंदर महाराज सोन्नर (परळी वैजनाथ), धम्मकीर्ती महाराज (परभणीकर) व दर्शन महाराज कबाडी (देवाची आळंदी) यांनी कीर्तनसेवा सादर केली. तसेच जागृती बोराडे व महिला भजनी मंडळ वैशाखरे, भैरवनाथ एकादशी प्रसादिक भजनी मंडळ टोकावडे परिसर यांनी जागर भजन सादर करत भक्तिमय वातावरण अधिक खुलवले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हभप हरिश्चंद्र घोलप, विठ्ठल घोलप, तानाजी बोराडे, कचरू तिवार, विठ्ठल पवार, बाळकृष्ण पवार, लक्ष्मण पवार, काशिनाथ पवार, भरत पवार, सेवक बोराडे, जगन भांगरथ, हरेश देशमुख, रवींद्र घरत, आशीष पवार, महेश पवार, पद्माकर पवार, विकास पवार, निकलेश पवार व मोहन वेखंडे यांनी विशेष सहकार्य केले. भोजन व्यवस्थेत जगदीश निमसे, रमेश कापडी, दत्ता विशे, कांताराम कंटे, काळूराम म्हाडसे, सुनील बांगर, प्रमोद कोयते, बाळा विशे, राजाराम गोल्हे, भावेश वेखंडे व दीपक मुंडे यांच्यासह ग्रामस्थ तरुणांनी मोलाची भूमिका बजावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.