पालिकेचे भत्ते महापौरांनी नाकारले
राजकीय नेत्यांसमोर कृतीतून नवा आदर्श
विरार, ता. २५ (बातमीदार) ः करदात्यांच्या करातून मिळणाऱ्या वाहनभत्ता, मानधनाच्या स्वरूपातील महिन्याचे ८५ हजार वसई-विरार महापालिकेचे महापौर अजीव पाटील यांनी नाकारले आहेत. या कृतीतून पैसे, सत्ता मिळविण्यासाठी झगडणाऱ्या राजकीय नेत्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
वसई-विरार महापालिका क वर्गातील असल्याने ११५ नगरसेवकांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे महापौर, उपमहापौर स्थायी समिती सभापती, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता आणि प्रभाग समितीच्या सभापतींना वाहनभत्ता दिला जाणार आहे. वसई-विरार महापालिकेच्या महापौरांना वाहन प्रतिपूर्ती भत्ता म्हणून दरमहा ७५ हजार रुपये दिले जाणार आहेत; मात्र महापौर पाटील यांनी वाहनभत्ता म्हणून मिळणारे ७५ हजार, दहा हजारांचे मानधन नाकारले आहेत. विशेष म्हणजे, अजीव पाटील यांचे ज्येष्ठ बंधू माजी महापौर राजीव पाटील यांनीसुद्धा कोणत्याही स्वरूपाचे भत्ते घेतले नाहीत, त्यामुळे त्यांच्या निर्णयाची वसई-विरारमध्ये सध्या चर्चा सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.