मुंबई

टंचाई नाही, अफवांचा कहर

CD

पेट्रोल टंचाईच्या अफवांनी नागरिकांची धावपळ
पंपांवर दीड-दोन किलोमीटरच्या रांगा
बदलापूर, ता. २५ (बातमीदार) : शहरात इंधन टंचाई असल्याच्या वावड्या उठल्यामुळे बदलापूर पूर्व आणि पश्चिम भागात नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात इंधनाचा पुरवठा सुरळीत असतानाही केवळ अफवांच्या आधारामुळे पेट्रोल पंपांवर दीड ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र मंगळवारी (ता. २४) आणि बुधवारी (ता. २५) पाहायला मिळाले.

उद्यापासून पेट्रोल मिळणार नाही किंवा इंधन दरवाढ होणार, अशा चुकीच्या चर्चा समाजमाध्यम आणि शहरात पसरल्याने नागरिकांनी पंपांकडे धाव घेतली. खासगी पेट्रोल पंपांना क्रेडिटवर इंधन मिळणे बंद झाल्याने काही जणांनी व्यवहार तात्पुरते थांबवले आहेत. याचा संपूर्ण ताण सरकारी पेट्रोल पंपांवर आला असून, तिथे प्रचंड गर्दी होत आहे. रात्रीपासूनच नागरिक रांगेत उभे असल्याने शहरातील काही मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात पेट्रोलचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे. कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही. केवळ भीतीपोटी नागरिक अनावश्यक साठवणूक करीत असल्याने ही गर्दी वाढत आहे. नागरिकांनी संयम बाळगून केवळ गरजेपुरतेच इंधन भरावे. विनाकारण साठवणूक केल्यास कृत्रिम टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे जबाबदार नागरिक म्हणून अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT