मुंबई

इंधन तुटवड्याच्या अफवांनी कल्याण परिसरात झुंबड

CD

कल्याण-डोंबिवलीत पेट्रोल पंपांवर झुंबड
इंधन तुटवड्याच्या अफवा
डोंबिवली, ता. २५ : राज्यातील विविध भागांनंतर आता कल्याण-डोंबिवली या मुंबईलगतच्या शहरांतही इंधन तुटवड्याच्या अफवांचे लोण पोहोचले आहे. पुढील काही दिवस पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, अशा वावड्या उठल्याने कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरातील पेट्रोल पंपांवर वाहनचालकांनी पहाटेपासूनच प्रचंड गर्दी केली.

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधनटंचाई निर्माण होणार असल्याच्या चर्चांनी नागरिकांमध्ये घबराट पसरली. यामुळे मंगळवारी रात्रीपासूनच अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली. कल्याण पश्चिमेकडील कोळवली परिसरात बुधवारी सकाळी तब्बल एक किलोमीटरपर्यंत रांगा पाहायला मिळाल्या. ३८ अंश तापमानात तासनतास उभे राहावे लागत असल्याने वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले. बदलापूरमधील काही पंपांवर केवळ दोन लिटर पेट्रोल दिले जात असल्याच्या वृत्ताने परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली. याचा परिणाम गॅस पंपांवरही दिसून आला.

अफवांवर विश्वास ठेवू नका
इंधन तुटवड्याचा दावा पेट्रोल पंपचालकांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. इंडियन ऑइल कंपनीकडून नियमितपणे टँकरद्वारे पुरवठा सुरू आहे. पेट्रोलचा कोणताही तुटवडा नाही. नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये, असे पेट्रोल पंपचालक
संकेत झेमसे यांनी सांगितले.

प्रशासनाकडून आवाहनाची गरज
प्रत्यक्षात पुरवठा सुरळीत असताना केवळ अफवांमुळे ही कृत्रिम गर्दी निर्माण झाली आहे. प्रशासनाने याप्रकरणी तातडीने स्पष्टीकरण देऊन नागरिकांना शांत करण्याची गरज व्यक्त होत आहे. अनावश्यक साठवणूक टाळल्यास ही परिस्थिती तातडीने नियंत्रणात येऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ बदल केले, पण Prithvi Shaw ला नाही खेळवले; पंजाब किंग्सच्या ताफ्यातही बदल

Pune Crime: आजोबाच्या अंत्यविधीसाठी एटीएममध्ये पैसे काढण्यास गेलेल्या नातवाला लुबाडले, पुण्याच्या औंध भागातील घटना

Jalgaon News : तासाभरापूर्वीच वडिलांशी बोलणे, नंतर मृत्यूचीच बातमी; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय

Thane Water Supply: उल्हासनगरात पुन्हा टँकरराज, ४५० कोटींच्या योजनांनंतरही पाणीटंचाई कायम

Pune Crime : पर्वतीमध्ये पूर्ववैमनस्यातून महिलेचे घर पेटवले

SCROLL FOR NEXT