मुंबई

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

CD

पनवेल, ता. २५ (वार्ताहर) : तळोजा एमआयडीसी परिसरातील पेंधर फाट्याजवळ असलेल्या नावडा सर्व्हिस स्टेशन येथे एका भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. २२) रात्री घडली. राजूसिंग फत्तेसिंग रजपूत असे मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात घडल्यानंतर ट्रकचालक वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला आहे. याप्रकरणी तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजूसिंग रजपूत आणि मुकेशकुमार चौधरी हे दोघे मित्र घोट गाव येथे राहण्यास असून दोघेही तळोजा एमआयडीसीतील ध्रुव लॉजिस्टिक्समध्ये कामाला होते. रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हे दोघे मित्र दुचाकीने कल्याण-पनवेल मार्गाने घरी जात होते. त्यांनी नावडा सर्व्हिस स्टेशनवर पेट्रोल भरल्यानंतर, राजूसिंग हा हेल्मेट घालण्यासाठी पेट्रोल पंपाच्या थोडे पुढे थांबला होता. त्याच वेळी पेट्रोल पंपातून डिझेल भरून बाहेर पडणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. त्यामुळे दोघे मित्र खाली पडले; मात्र राजूसिंग हा ट्रकच्या समोरील चाकाखाली आल्याने तो गंभीर जखमी झाला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panchang 15 May 2026 : आजचे पंचांग! शनि जयंती, अमावस्या आणि शुभ मुहूर्त; जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण राशीभविष्य

Weekend Breakfast Special: रोजच्या पराठ्यांना द्या हेल्दी ट्विस्ट! वीकेंडला ट्राय करा पनीर स्टफ्ड बीटरूट पराठा

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १६ मे २०२६ ते २२ मे २०२६ - मराठी राशी भविष्य

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

SCROLL FOR NEXT