थकबाकीदारांच्या मालमत्तांवर टाच
वसई-विरार पालिकेकडून कारवाईचा धडाका
वसई, ता. २५ (बातमीदार) ः वसई-विरार शहर महापालिकेने मालमत्ता कर वसुली मोहीम तीव्र केली आहे. आतापर्यंत दोन हजार ३५३ मालमत्ता तसेच ९२ नळजोडण्या खंडित करण्यात आल्या असून २५ मार्चपर्यंत ३७५ कोटी ८९ लाखांची करवसुली केली आहे.
वसई-विरार शहर पालिका क्षेत्रात १० लाख १६ हजार आहेत. मालमत्ताधारकांना देयके दिल्यानंतर करवसुलीसाठी पथक फिरत आहे. औद्योगिक वसाहत, नागरिक वस्ती, व्यापारी दुकानांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. मालमत्ता कर उत्पन्नाचा स्रोत असून अधिकाधिक करवसुलीसाठी नऊ प्रभागांत मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार प्रभाग समिती ‘क’मध्ये ७५६ मालमत्ता आहेत. तर प्रभाग समिती ‘ब’मध्ये ४८ इतक्या नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. तसेच नऊ प्रभागांपैकी जी प्रभाग समितीतून ११४ कोटींहून अधिक करवसुली करण्यास आली आहे.
--------------
८६० कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट
वसई-विरार शहरात विविध विकासकामे, नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालिका प्रयत्न करत आहे. नागरिकीकरण वाढू लागल्याने त्या दृष्टिने निधीची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने ८६० कोटींच्या करवसुलीचे उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यामुळे आर्थिक वर्षअखेरीस किती करवसुलीसाठी बड्या थकबाकीधारकांच्या मालमत्ता जप्तीला सुरुवात केली असून भविष्यात लिलाव प्रक्रियेला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी दिला आहे.
-----------
प्रभाग समिती - वसुली जप्त मालमत्ता नळजोडण्या खंडित
अ - ३८९५.८७ १२० ०
ब - ४४०७.६४ ७५६ ४८
क - २५३४.६३ ८१० ३
ड - २२८८.०३ ५९ ०
ई - २९२१.२७ २५८ १५
एफ ६२११.३९ ९५ ०
जी ११८३४.५७ २१५ २६
एच २०२७.७६ २२ ०
आय १४७८.२५ १८ ०
--------------
वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील रहिवासी, वाणिज्य वापराच्या मालमत्ताधारकांकडून करवसुलीसाठी पथक नेमण्यात आले आहे. पालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत असलेला कर भरणा लवकरात लवकर करून महापालिकेला सहकार्य करावे.
- स्वाती देशपांडे, उपायुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.